जगप्रसिद्ध कंपनी ड्युकाटीने नुकतीच एक खुशखबर दिली आहे. ड्युकाटी पुढील वर्षात भारतात आपली नवी बाइक लाँच करणार आहे. Ducati 2021 Monster असे या बाइकचे नाव असून २०२१ मध्ये ती भारतात लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या बाईकचा लूक आणि डिझाईन सध्याच्या तरुण पिढीला एकदम साजेसा आहे. या बाईकची किंमत १० लाखांच्या आसपास आहे. बाइकस्वारांमध्ये ड्युकाटी बाइकची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. म्हणून आपल्या ग्राहकांना काही तरी नवीन देण्याच्या उद्देशाने ही बाईक भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या या मिडलवेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल रेसिंगची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी बनवली आहे. ही बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लसचा सहाभाग असणार आहे. याचसोबत ग्राहक आपल्या आवडीनुसार, बाईकवर हीटेड ग्रिप आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टमही लावू शकतात. Ducati 2021 Monster ला पॉवरसाठी ९३७cc इंजिन लावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जे ९,२५० rpm वर ११०bhp आणि ६,५०० rpm वर ९३ Nm पीक टॉर्क करेल.
भारतात Ducati 2021 Monster ची थेट स्पर्धा Triumph Street Triple R सोबत होणार आहे. भारतात याची किंमत ८.८४ लाख रुपयांपासून ११.33 लाखांमध्ये असणार आहे. Street Triple R च्या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने नवीन बॉडीवर्क, फ्लाइस्क्रीन आणि साइड पॅनल यांसारखे खास फिचर्स देखील अॅड केले आहेत. Triumph Street Triple R मध्ये स्ट्रीच ट्रिपल आरएसमध्ये देण्यात आलेले ७६५ cc चे इन-लाइन थ्री-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहेत. दरम्यान हे इंजिन थोड्या कमी ट्यूनसोबत येत. या बाईकचं इंजिन १२,००० rpm वर ११६ bhp ची पॉवर देते. तर RS चं इंजिन ११,७५० rpm वर १२१ bhp ची पॉवर देते. परंतु, टॉर्क दोघांमध्येही समान ९,३५० rpm वर ७९ bhp असे पाहायला मिळते आहे. Street Triple RS च्या तुलनेत Street Triple R मध्ये वेगळ्या रॅक आणि ट्रेलमध्ये दिसून आली आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार, बाईकवर हीटेड ग्रिप आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टमही लावू शकणार असल्याने या बाईकचं वजन १८ किलोंनी कमी करण्यात आले आहे. त्यासाठी बाईकची नवी फ्रेम Panigale V4 पासून प्रेरिक आहे. ज्यामुळे आता बाईकचे वजन १६६ किलो एवढे क्षले आहे.