Thursday, February 25, 2021
Home Automobiles & Bikes Renault चार चाकी वाहनांवर भरघोस सूट

Renault चार चाकी वाहनांवर भरघोस सूट

फ्रेंच कार निर्माता कंपनीने भारतातील वाहनांवर ६५,००० रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये समाविष्ट केलेल्या वाहनांमध्ये ट्रायबर, रेनो क्विड आणि रेनो डस्टरचा समावेश आहे. नव्या वर्षात प्रत्येक कंपनी आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना बंपर सूट देतेय. अशातच रेनॉल्टनंही आपल्या सर्व गाड्यांवर सूट देण्यास सुरुवात केली आहे. पाहूया नक्की काय दिल्या आहेत प्रत्येक मॉडेलवर सूट.

ट्रायबरवर ग्राहकांना २०,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि १०,०००  रुपयांचा लॉयल्टी लाभ देखील मिळू शकेल. रोकड सवलती बद्दल सांगायचे तर एएमटीवर ही सूट २०,०००  रुपये आहे आणि आरएक्सएल / आरएक्सटी/ आरएक्सझेड एमटी व्हेरिएंटवर ही सूट १०,००० रुपये आहे. ट्रायबरवर कॉर्पोरेट सूट १०,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे,  तर ग्रामीण ग्राहकांना विशेष ऑफर अंतर्गत ५००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. ग्राहक या वाहनांना ५.९९ टक्के व्याज दराने विशेष वाहन खरेदी करू शकतात.

ग्राहकांना रेनो डस्टर 1.5 लिटर वर ४५,००० रुपयां पर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे, तर आरएक्सएस आणि आरएक्सझेड व्हेरिएंटवर तुम्हाला ३०,००० रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. वाहनांवर १५,००० रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट देखील उपलब्ध आहे.

रेनो क्विड या वाहनावर २०,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळतेय, जी एमटी व्हेरिएंटना लागू आहे, तर मॅन्युअल व्हेरिएंटवर १५,००० रुपयांपर्यंत सूट आहे. लॉयल्टी बेनिफिट्सबद्दल सांगायचे झाल्यास ग्राहकांना १०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याचबरोबर एएमटीवर २०,००० रुपये आणि मॅन्युअलवर १५,००० रुपये सूट आहे. कॉर्पोरेट सवलतीच्या अंतर्गत ही ऑफर १०,००० रुपये आहे. वाहनवरील विशेष व्याजदर ५.९९ टक्के आहे.

रेनो डस्टरवर 1.3 लीटर या व्हेरिएंटवर तुम्हाला ३०,००० रुपयां पर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते, जी फक्त आरएक्सएस आणि आरएक्सझेड व्हेरिएंटसाठी लागू आहे.लॉयल्टी बेनिफिट्स आणि रोख फायद्यांबद्दल बोलल्यास ते १५,००० आणि २०,००० रुपये आहे. रोख ऑफर केवळ सीव्हीटी आणि एमटी रूपांवर उपलब्ध आहे. डस्टरच्या या प्रकारात ६५,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या सर्व ऑफर केवळ ३१ जानेवारी २०२१ पर्यंतचं वैध आहेत आणि त्यादेखील काही निवडलेल्या मॉडलवर आहेत. मॉडेलनुसार किंमत वेगवेगळ्या असू शकतात. अधिक माहितीसाठी जवळील शो रूम मध्ये जाऊन माहिती मिळविणे नक्कीच योग्य ठरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments