Friday, February 26, 2021
Home Automobiles & Bikes टाटा मोटर्सच्या शेअर्सना उभारी

टाटा मोटर्सच्या शेअर्सना उभारी

टाटा मोटर्सचा प्रवास १९४५ पासून सुरू झाला आहे. तसेच अगणित उंची पर्यंत पोहोचला आहे. बीएस६ रेंजच्या टियागो, टिगोर, नेक्सॉन, हॅरियर आणि अल्ट्रोज यासारख्या कारला लाँच करून महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला असल्याचे दिसत आहे. टाटा मोटर्स सध्या भारतातील तिसरी सर्वात मोठी पॅसेंजर व्हीकल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी असल्याचा दावा करते. गेल्या दोन तिमाहीत कंपनीने कारच्या विक्रीत मोठ्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे.

टाटा मोटर्सच्या शेअर्समधील गेल्या काही महिन्यांतील वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीची मोठ्या प्रमाणात झालेली वाहन विक्री. टाटा मोटर्सच्या घरगुती आणि JLR व्यवसायाने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. डिसेंबरमध्ये कंपनीची एकूण देशांतर्गत कारची विक्री ५३,४३० इतकी होती. मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे २१ टक्क्यांनी अधिक आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या प्रीमियम हॅचबॅक Altroz ची आयटर्बो पेट्रोल व्हर्जन बाजारात आणले आहे. याशिवाय टाटाने आपल्या वाहनांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. जानेवारीत आतापर्यंत, त्याच्या शेअर्समध्ये नेत्रदीपक ५२ टक्के वाढ दिसून आली आहे. या कालावधीत BSE के ऑटो इंडेक्समध्ये १३ टक्के तर सेन्सेक्समध्ये १.२५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. बाजारातील दिग्गजांचा असा विश्वास आहे की, यात आणखीही वाढ होऊ शकेल. या शेअर्सच्या जोरदार वाढीमुळे,  त्यात नफा होण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीवर नजर टाकल्यास पॅसेंजर व्हीकल सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सचे मार्केट शेयर ७.९ टक्के आहे. तर एप्रिल-ऑक्टोबरच्या दरम्यान कंपनीची गेल्या वर्षीच्या ग्रोथच्या तुलनेत २१ टक्के राहिली आहे. या वर्षी आपली प्रसिद्ध हॅचबॅक टाटा टियागोची विक्री ३ लाख आकडा पार केला आहे. कंपनी लागोपाठ नवीन प्रोडक्ट लोकांसमोर आणले आहे. हे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नुकतीच कंपनीने बीएस ६ कम्प्लायंट इंजिन पासून कंपनीने लूक आणि डिझाईन मध्ये जबरदस्त प्रोडक्टवर फोकस केला आहे,  असे त्यांनी सांगितले आहे. टाटा मोटर्स आगामी काळात एकापेक्षा एक एसयूव्ही आणि एमपीव्ही लाँच करणार आहे, असे टाटा मोटर्समध्ये पॅसेंजर व्हीकल बिजनेस युनिटचे मार्केटिंग हेड विवेक श्रीवत्स यांनी सांगितले. चीनकडून JLR च्या जोरदार मागणीमुळे गेल्या काही व्यापार सत्रात शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. याशिवाय टेस्लाबरोबर कंपनीच्या भागीदारीच्या वृत्तामुळे टाटा मोटर्सच्या शेअरलाही चालना मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments