Thursday, February 25, 2021
Home Automobiles & Bikes टेस्लाची भारतात लक्झरीयस एन्ट्री

टेस्लाची भारतात लक्झरीयस एन्ट्री

टेस्लाचे सीएओ एलन मस्क यांनी गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ट्विटरवरून २०२१ मध्ये टेस्ला भारतात प्रवेश करेल असे ट्वीट केले होते. केंद्रीय रस्ते बांधणी आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही या बातमीला दुजोरा दिला होता. भारत येत्या पाच वर्षात दुनियेतील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचे केंद्र बनेल असेही गडकरी यांनी सांगितले होते. टेस्लाने कोरोना काळात सुद्धा २०२० मध्ये जवळजवळ ५ लाख कार्स विकल्या आहेत. या वर्षात कंपनीची उलाढाल ३६ टक्क्याने वाढली होती.

टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रा.लिमिटेड नावाने या कंपनीची नोंदणी केली गेली असून त्याचे कार्यालय बंगलोर येथे स्थापन केले आहे. येथेच कंपनी त्यांच्या लग्झरी कार्सचे उत्पादन आणि संशोधन विकास केंद्र चालविणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरुप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. कंपनीचे सीएफओ वैभव तनेजा म्हणाले, कंपनीची नोंदणी ८ जानेवारी रोजी केली गेली आहे. कंपनी या वर्षात भारतात तीन मॉडेल सादर करेल. वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत या कार्सची डिलीव्हरी केली जाईल.

काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा टेस्ला सोबत चर्चा झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळेस टेस्लाला महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकीसाठी आमंत्रित करण्याबाबत बातचीत झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच टेस्लाची भारतात एंट्री ही केवळ गुंतवणूकीपुरता मर्यादीत नाही तर इलेक्ट्रिक मोबीलिटी आणि शाश्वत विकासावर विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्वीट करत आदित्य ठाकरेंच्या जुन्या ट्वीटचा फोटो शेअर करत ‘टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज ३ मंत्र्यांना झटका” बोलाची कढी बोलाचा भात”‘ म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, कंपनीने आता नोंदणी केली असली तरी ते येथे काय करतील याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही. ही पहिली स्टेप आहे आणि प्रधान सचिवांच्या नेतृत्वात आमचे अधिकारी या कंपनीशी सतत संवाद साधत आहेत. या कंपनीला सर्वोतोपरी मदत देण्यास सरकार तयार आहे. कंपनीने वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन या तीन जणांची नावे संचालक म्हणून जाहीर केली आहेत. सार्वजनिकपणे उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार तनेजा हे मूळ कंपनीत मुख्य लेखा अधिकारी असतील. मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला भारतमध्ये लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि व्यापार करेल. यासाठी त्यांची ५ राज्यांशी बोलणी चालू आहेत. टेस्लाची भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करण्याची तसेच संशोधन व विकास केंद्र स्थापित करण्याची योजना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments