काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला हे आपण सगळे जाणतो. त्यानंतर अभिषेकसह बच्चन कुटुंबियांनाही कोरोना झाला. कपिल शर्मा शोमध्ये कपीलने कोरोना बद्दलचे काही प्रश्न अभिषेकला विचारले. कोरोना काळात दिनक्रम कसा असायचा? ‘तुला करोना झालाच कसा?’ असा प्रश्न विचारल्यावर अभिषेकने तात्काळ बाबांमुळे, असं उत्तर दिलं. बाबांना कोरोना झाल्यामुळे मग तो मला झाला असं अभिषेकने सांगितलं. पण अभिषेकचं हे उत्तर अजय देवगणला अजिबात पटले नाही. हा सगळा किस्सा अभिषेकने सांगितला आहे.
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट जेंव्हा कोव्हिड पोझीटीव्ह आला होता, योग्य उपचार घेऊन बरे झाल्यावर आता दोघेही बच्चन आपापल्या कामासाठी घराबाहेर जाऊ लागले आहेत. बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची सध्या चालू असलेली कॉलर ट्यूनही तात्काळ बंद करावी यासाठी कोर्टात धाव घेण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांचा आवाज कोरोनाच्या काळजीच्या सूचना करण्यासाठी वापरू नयेत असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
परंतु, अभिषेकचं असे उत्तर ऐकून अजय देवगणने तात्काळ अभिषेकशी संपर्क साधला आणि त्याला त्याच्या उत्तराबद्दल चांगलचं धारेवर धरल. अजय म्हणाला, तुला कोरोना झाला तो बाबांमुळे असं तू कसं म्हणतोस. कारण संपूर्ण कोरोनाच्या काळात अमिताभ बच्चन कुठेत घराबाहेर पडले नव्हते. उलट तूच या काळात कामासाठी बाहेर पडलास. त्यानंतरच कोरोना बाबांना झाला असं अजयचं म्हणण आहे. अजयच्या या झापण्याला अभिषेकने अर्थातच आदराचं स्थान दिलं आहे. तो म्हणतो, अजय आणि बच्चन कुटुंबियांचे संबंध अगदी घरगुती आहेत. त्याच प्रेमापोटी तो हे बोलला. पण सर्वसाधारणपणे असं थेट मध्ये कोणी बोलयचं धाडस करत नाही. पण अजयने ते धाडस दाखवल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, अभिषेकने ते सकारात्मकतेने घेऊन मान्यही केले.
काही वर्षांपूर्वी जमीन नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात मुख्य भूमिका अजय देवगण, अभिषेक बच्चन यांची होती. सिनेमात अजय देवगण सैन्यातला अधिकारी असतो. तर अभिषेक बच्चन पोलीसांत काम करत असतो. अभिषेकही आधी सैन्यात असतो. पण अभिषेकच्या एका बेजबाबदार कृत्यामुळे त्याला सैन्य सोडावं लागतं आणि तो पोलीस होतो. तो सैन्यात असताना त्याचा बॉस असतो अजय देवगण. त्याच्या बेजबाबदार कृत्याबद्दल अजय देवगण त्या सिनेमात त्याला दम देतो. याच सीनची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. कारण अजय देवगणने पुन्हा एकदा अभिषेक बच्चनला खडसावले आहे.