Monday, March 1, 2021
Home Entertainment जर झालात करोडपती तर जाणून घ्या किती भरावा लागतो कर !

जर झालात करोडपती तर जाणून घ्या किती भरावा लागतो कर !

कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिन्दी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जातात. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसऱ्या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती. चौथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली. या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसऱ्या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले गेले. दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्या आधी दोन ते तीन महिने अगोदर नावे नोंदवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते.

एकदा तरी, बिग बींसमोर असणाऱ्या त्या ‘हॉट सीट’ वर बसत केबीसी मध्ये सहभागी होण्याचे आणि जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाबाबत अनेकांनाच कायम कुतूहल वाटत आले आहे. सूत्रसंचालकाच्या रुपात दिसणारे बिग बी अमिताभ बच्चन कार्यक्रमाची लोकप्रियता आणि त्याहूनही या कार्यक्रमातील विजेत्यांच्या नावे दिली जाणारी रक्कम ही यामागची प्रमुख कारण आहेत. पण केबीसीमध्ये एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या विजेत्या किंवा विजेतीला ही पूर्ण रक्कम मिळत नाही. जिंकलेल्या रकमेपैकी काही भाग हा त्यांना कर स्वरुपात जमा करावा लागतो.

टीडीएस अंडर सेक्शन १९४ बी नुसार जर कोणी स्पर्धक १ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात जिंकला तर, त्यावर त्याना ३० टक्के म्हणजेच ३० लाख रुपयांचा कर भरणे अपेक्षित आहे. यासोबतच ३० लाख रुपयांच्या करावर १० टक्के सरचार्जही करण्यात येतो. ज्याची रक्कम ३ लाख इतकी आहे. ३० लाख रुपयांच्या रकमेवर ४ टक्के सेस म्हणजेच १.२ लाख रुपयेही आकारले जातात. परिणामी १ कोटी रुपयांच्या रकमेवर कर लागल्यामुळं विजेत्याला ३४.२ लाख रुपये कर स्वरुपात द्यावे लागतात. इतकी रक्कम कर स्वरुपात दिल्यानंतर विजेत्यांच्या हाती फक्त ६५ लाख रुपयेच उरतात. आकडेवारी भुवया उंचावणारी असल्यामुळे कौन बनेगा करोडपतीचा विजेता बक्षीस स्वरुपात मात्र करोडपती होत नाही, हीच बाब समोर येत आहे. परंतु, असे असले तरीही कौन बनेगा करोडतीच्या मंचावर आल्यानंतर त्यांच्या वाट्याला येणारे मौल्यवान क्षण आणि विशेष अनुभव यांचे महत्त्वही तितकेच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments