प्रेग्नंट अनुष्का शर्मा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर प्रेग्नंसी काळात वोग इंडिया या मॅगझिनसाठी तिने केलेले फाटोशूट. अनुष्काने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊन्टवरुन शेअर केले आहेत. अनुष्काने वोग या प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणातील प्रवास फोटोंच्या माध्यमांतून चाहत्यांसह शेअर करत आहे. आता नुकतेच अनुष्काने तिचे बेबी बंप फोटोशूट केले आहे. अनुष्काने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊन्टवरुन शेअर केले आहेत. अनुष्काने वोग या प्रसिद्ध मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. जानेवारी २०२१ च्या एडिशनसाठी हे फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये ती बोल्ड दिसत आहे. अनुष्काचे हे बेबी बंपसोबतचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा, त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. अनुष्काचे हे फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने “ब्युटीफुल” अशी कमेंट केली आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण सोबत या फोटोशूटमुळे अनुष्काला जबरदस्त ट्रोलही केले जातेय. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी या फोटोंचे कौतुक केले. पण काहींनी मात्र यावरून अनुष्काला चांगलेच फैलावर घेतले. या असल्या फोटोशूटची खरोखरच गरज आहे का? असा सवाल एक इन्स्टाग्रामरने केला. अन्य एकाने करायचे तर फोटोशूट कर, पण हे असले फोटो पब्लिकला कशाला दाखवतेस अशा शब्दांत तिला फटकारले. काहींनी अनुष्का व विराट आपल्या न जन्मलेल्या मुलाची जाहिरात करत असल्याची, न जन्मलेल्या मुलाच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याची टीका केली.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी २७ ऑगस्ट २०२० रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यांच्या जीवनात येणाऱ्या या नव्या पाहुण्याची माहिती सर्वांना दिली होती. ज्यानंतर या जोडीवर शुभेच्छांचा भरपूर वर्षाव करण्यात आला. विराट लवकरच बाबा बनणार असून तो पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात आला आहे. अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे.