बॉलिवूड स्टारप्रमाणेच त्यांची मुलंही कायमच प्रसिद्धी झोतात असतात. स्टार्सही त्यांच्या मुलांच्या जीवनशैलीची खूप काळजी घेत असतात. त्यांची असणारी विशेष जीवनशैलीमुळे ती कायम चर्चेत राहतात.
झिवा धोनी –
धोनीप्रमाणंच झिवाही तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेटमुळं फार कमी वयातच प्रकाशझोतात आली आहे. झिवाचे अनेक फोटो धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. झिवा अनेकदा Burberry या ब्रँडच्या कपड्यांमध्ये दिसते. ज्यामुळं तिला या ब्रँडची अन ऑफिशियल ब्रँड अॅम्बेसेडरही म्हटलं जातं. देशातील सर्वाधिक स्टायलिश लहान मुलांमध्ये तिची गणना होते. झिवा अनेकदा डिझायनर कपड्यांमध्ये दिसते. झिवाच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसते. स्टाईल स्टेटमेंटमुळं धोनीची ही मुलगी खऱ्या अर्थानं सुपरहिट ठरते आहे.
तैमुर अली खान –
सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर नेहमीच लाइम लाइटमध्ये असतो. तैमूरच्या नावावरही बराच वादंग निर्माण झाला होता. तैमूरलंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचं म्हटलं जातं. पण तैमूर या शब्दाचा दुसरा अर्थ शूर, बलवान, प्रसिद्ध राजा असाही होतो. सर्वात जास्त चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमूर अली खान.
अदिरा चोप्रा –
राणी मुखर्जी आणि यश चोप्रा यांना एक सुंदर मुलगी आहे. राणी आपल्या मुलीला प्रसार माध्यमांपासून शक्यतो लांबच ठेवते. राणीच्या मुलीचं नाव अदिरा आहे. हे नाव आदित्य आणि राणी यांची फोड करून बनवण्यात आलं आहे. आदित्यचं ‘आदि’ आणि राणीचं ‘रा’ हे शब्द घेऊन ‘आदिरा’ हे नाव तयार केलं गेलं आहे.
सुहाना खान –
किंग खान शाहरूख आणि गौरीची मुलगी सुहाना एक फेमस स्टार किड आहे. सुहानाला लिहिण्याची खूप आवड आहे आणि तिला खेळाचीही आवड आहे. आयपीएलच्या बर्याच सीझनमध्ये ती पापा आणि बाकीच्या कुटुंबासमवेत सामने बघायला आली. सुहानालाही फुटबॉल आवडते. सुहाना खानचे अनेक फॅन पेज असूनही त्याचे अधिकृत खाते नाही. त्यांच्यावर वेळोवेळी सुहानाची नवीन छायाचित्रे दिसतात. शाहरुख खानची मुलगी सुहाना आगामी काळात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करू शकते. करण जोहर त्याला पहिला ब्रेक देणार असल्याच्या बातम्या आहेत. २०१८ मध्ये सुहानाने व्होग मॅगझिनसाठी फोटोशूटही केले. सुहाना खान या दिवस लंडन मध्ये शिकत आहे. पुढच्या वर्षी ती महाविद्यालयातून पदवीधर होईल.