Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood नव्या विषाणूमुळे लॉकडाऊन झाले भारतीय सिनेस्टार्स

नव्या विषाणूमुळे लॉकडाऊन झाले भारतीय सिनेस्टार्स

ग्रेट ब्रिटनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं अतिशय सक्तीनं पालन करण्यात येत आहे. त्यामुळे कलाकारांना परतीचे मार्ग सापडेनासे झाले आहेत. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतची माहिती दिली. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

नव्या कोरोना व्हायरसच्या प्रकारामुळं इंग्लंडमध्ये ओढावलेलं संकट आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळं अनेक मोठे सेलिब्रिटी तिथं अडकल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. सैराट चित्रपट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पण, रिंकू काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिल्याचं कळत आहे.

rinku rajguru

काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला माहिती दिली. याबाबत दहशतीचं वातावरण असतानाच आता कोरोना विषाणूचा नव्यानं आणखी एक प्रकार समोर आल्यामुळे या दहशतीत अजूनच भर पडली आहे. भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्यावेळी कलाविश्वातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होते. पण, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. अनेक कलाकार पुन्हा चित्रीकरणांमध्ये व्यस्त झाले आहेत. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा,  आफताब आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनच्या या समस्येत सापडलेल्या सेलिब्रिटींसमवेत त्यांच्या चित्रपटातील इतर क्र्यू मेंबर्सही असल्याचे कळते आहे.

नव्या विषाणूमुळं संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढण्याची भीती असल्यामुळं काही भागात सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यात आली आहेत. ज्यामुळं अनेक भारतीय सेलिब्रिटी इंग्लंडमध्ये अडकले आहेत. कोरोना व्हारसच्या नवीन प्रकारामुळे ब्रिटन पूर्णता: हादरून गेले आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर विविध देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. यामुळे शूटिंगच्या निमित्तानं लंडनमध्ये गेलेल अनेक सेलिब्रिटी तिथेच अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. हिंदी प्रमाणे मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार सिनेमाच्या चित्रीकरणासाठी काही आठवड्यांपूर्वी तिथेच होते. पण त्यांना या विषाणूचा सामना करावा लागला नसून काही सेलिब्रिटी तिथे लॉकडाऊन व्हायच्या आधीच सुखरुप मायदेशी परतले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments