Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood कोरोनामुळे अनेक चित्रपट प्रदर्शन वेटिंग लिस्टवर

कोरोनामुळे अनेक चित्रपट प्रदर्शन वेटिंग लिस्टवर

मागील ८-९ महिन्यांपासून जगभरात चाललेला कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या माणसांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या आयुष्यावर परिणाम झालेला दिसून येतो. जगभरात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यासाठी संशोधन सुरु आहे. सर्वत्र असलेल्या लॉकडाऊन मुळे नोकऱ्या, व्यवसाय सर्व ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम जाणवायला लागला आहे. कोरोनाची स्थिती पाहता आणि शासनाने त्यावर घातलेले निर्बंध हळूहळू शिथिल होताना दिसत आहेत. त्यामुळे जनजीवन पुन्हा पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच धर्तीवर सध्या लॉकडाऊनमुळे खीळ बसलेल्या मराठी चित्रपटांची संख्या जवळपास ४० च्या घरात जाते. सगळ्यांनाच चित्रपट प्रदर्शित करायचे आहेत. पण हे नेमके कधी आणि कसे रिलीज करायचे याबद्दल साशंकता आहे. मधल्या काळात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याच्या बातम्यांनीही इंडस्ट्री पुन्हा धास्तावली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर पुन्हा एकदा इंडस्ट्री नव्या जोमाने नियोजनाला लागली आहे.

५ नोव्हेंबरपासून राज्य सरकारने सिनेमागृहं आणि नाट्यगृह खुली करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाचा प्रभाव पाहता ५० टक्के प्रेक्षकसंख्येचा नियम घालून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रात काही सिनेमे थिएटर मध्ये दाखविण्यात आले. तर काही थिएटर मालकांनी काही नवे तर काही बरेच जुने सदाबहार सिनेमे पुन्हा एकदा थिएटरवर दाखवले असले तरी राज्यातल्या थिएटर मालकांना प्रतीक्षा आहे ती गर्दी खेचणाऱ्या सिनेमांची. त्यामुळे लॉकडाऊन काळात राज्यातल्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनी आपल्या थिएटर्सची डागडुजी केली असली तरी अजून त्यांनी ही थिएटर्स सुरू केलेली नाहीत. सध्या अनेक मल्टिप्लेक्स हे मॉल्समध्ये असतात. त्यामुळे मॉलमध्ये येणारा प्रेक्षक त्यांना मिळतो. खरेदी करणारा, फिरायला येणारा, आवर्जून सिनेमा पाहणारा असा वर्ग त्यात असतो. पण सिंगल स्क्रीन्सचं तसं नसते. तिथे फक्त सिनेमाचा आनंद घ्यायलाच लोक येतात. मग त्यांना थिेएटरमध्ये खेचून आणण्यासाठी सिनेमाही त्या दर्जाचा हवा. त्या सिनेमाची वाट सध्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहं पाहात आहेत. चांगले मोठे सिनेमे आले तर लोकही थिएटरमध्ये यायला बाहेर पडतील. खरंतर बरेच चित्रपट आता प्रदर्शनाच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. परंतू  सिंगल स्क्रीन्स पुर्ण न उघडल्याने निर्मात्ये साशंक असल्याचे चित्र दिसून येते. सध्याचे चित्रपट पाहता फार प्रेक्षकवर्ग उपस्थित नसल्याने त्यापेक्षा आणखी थोडी वाट पाहायला हरकार नाही, नाहीतर गेले आठ महिन्यांपासून व्यावसाय थांबला आहे, तर आणखी थोडं थांबू असा त्यांचा विचार दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments