Monday, March 1, 2021
Home Entertainment Bollywood क्रिकेटपटू इरफानचे तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

क्रिकेटपटू इरफानचे तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

जेंव्हा सर्वांच्या आयुष्याची कारकीर्द सुरु होते त्या वयात म्हणजेच ३५ व्या वर्षीय इरफान पठाणने क्रिकेटला गुडबाय केला होता. इरफानने टीम इंडियाकडून शेवटचा सामना ८ वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१२ मध्ये खेळला होता. कोलंबोमध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इरफानचा शेवटचा सामना होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इरफानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये सय्यद मुश्ताक अली चषकात जम्मू काश्मीरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. डावखुरा गोलंदाज असलेल्या इरफानने २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अॅडिलेड कसोटीतून पदार्पण केलं होतं. डावखुरा स्वींग गोलंदाज म्हणून इरफानने दमदार कामगिरी करत कमी कालावधीतच प्रसिद्धी मिळवली होती.

सध्या इरफान चर्चेत आला आहे ते, त्याच्या आयुष्याच्या नवीन वळणामुळे. त्याच्या सिनेसृष्टीतल्या पदार्पणामुळे. इरफान पठाण कोब्रा नावाच्या तमिळ चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाबद्दल पाहूया थोडक्यात माहिती. यात इरफान पठाणचे नाव असलन यिलमाझ असेल आणि तो एका फ्रेंच इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार चियान विक्रमदेखील दिसणार असल्याचे कळते आहे. यात विक्रम मुख्य भूमिकेत असेल तर, इरफानची छोटी भूमिका असणार आहे. चियान विक्रम या चित्रपटात भारतीय हेराची भूमिका साकारत असून, बर्‍याच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. कोबरा चित्रपटाचा टीझर देखील रीलिज झाला आहे. हा टीझर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अजय गनामुत्थु हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात के एस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी यांच्यासारखे कलाकार देखील आहेत.

irfan pathan with his son

इरफान पठाणचे भारताने २००७ मध्ये जिंकलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीस संघात मोठे योगदान आहे. इतकंच नाही तर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इरफान पठाणने धडाकेबाज कामगिरी केल्याने तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इरफानने सलग तीन विकेट घेतल्या होत्या. इरफानने २००६ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात तडाकेबाज कामगिरी करत हॅटट्रिक केली होती. इरफानची तुलना माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी केली जाते. कपिल देव यांच्यानंतर एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफान पठाणकडे पाहिलं जात होतं. भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठान आता चित्रपटात आपल लक आजमवणार आहे. इरफान पठाण एका तमिळ चित्रपटातून पदार्पण करतोय. तमिळ सिनेमा कोब्रा  मधून तो सिनेजगतात येतोय.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments