दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर वक्तव्य करताना कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी संबोधलं होतं. त्यामुळे नेटिझन्सकडून तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाने या आधीही टीका केली होती. दिल्लीतील हिंसाचारावर टीका करताना एका व्हिडीओच्या माध्यमातून कंगना म्हणाली होती की, “स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकलं पाहिजे. तसेच सरकारने त्यांची संपत्ती जप्त करावी. आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला, तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर यशस्वी मात करुन देश उभारत आहे. याशिवाय कोरोनाच्या संकट काळात आपण संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांपैकी आपण एक आहोत. हिंसाचाराच्या या प्रकारामुळे जगात आपली खिल्ली उडवली जात आहे. आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही.” या ट्वीटसोबत कंगनाने दिल्लीतल्या हिंसाचारावर अनेक ट्वीट केले आहेत. या माध्यमातून तिने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर सडकून टीका केली आहे.
Sick and tired of riots and blood bath almost every month , Delhi, Bangalore and now again Delhi #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ #RedFort pic.twitter.com/pWhXtOrqkx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत.” शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत. याविषयी कंगनाने ट्वीट करुन माहिती दिली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. दरम्यान या हिंसाचारावर भाष्य करताना अभिनेत्री कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली आहे. आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तरी आपल्याकडील काही लोक नग्न होऊन बसतात. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही, हे असं किती दिवस सुरू राहणार आहे. आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत. त्यामुळे बाहेरील जगासमोर आपली काहीही इज्जत राहिलेली नाही, असेही कंगना म्हणाली. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगनाला काही अंशी महागातचं पडल आहे.