दीपिका सध्या महाभारत या चित्रपटातल्या द्रोपदीच्या व्यक्तिरेखेची तयारी करते आहे. या चित्रपटाबद्दल ती फारच उत्सुक आहे. हा चित्रपट आणि यातली भूमिका याबद्दल बोलताना ती म्हणाली, खरंतर हा सिनेमा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण, द्रौपदीबद्दल आपल्याला फारसं काही माहीत नाही. त्यामुळे या कथानकाच्या आधारे द्रौपदीची व्यक्तिरेखा आणि तिचे म्हणणं आता जगासमोर मांडायची इच्छा आहे. महाभारतात पांडवांनी खेळात द्रौपदीला डावावर लावलं आणि त्यानंतर कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण त्याही पलिकडे एक स्त्री म्हणून तिला काय सांगावं वाटतं, काय म्हणावं वाटतं ते सांगण्याचा हा एक छोटासा कयास असणार आहे.
दीपिकाने अलिकडेच फेमिना या नियत कालिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा उच्चार केला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं होतं. यावेळी बॉलिवूडवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. कोणीही बडा कलाकार यातून सुटला नव्हता. सुशांतच्या केसमध्ये आधी सीबीआय त्यानंतर इडी आणि त्यानंतर नार्कोटिक्स ब्युरोला भाग घ्यावा लागला होता. यातल्या एनसीबीने केलेल्या तपासात बरीच मोठी नावे बाहेर आली होती. या सर्वांना चौकशीसाठीही बोलवण्यात आलं होतं, यात दीपिकाचं नाव होतं. त्यावेळी दीपिका गोव्यात शूट करत होती. एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा दीपिकाच्या नावाची चर्चा झाली नाही. दीपिकासोबत रकुल प्रीत सिंग, सारा खान, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी झाली. गेल्या काही महिन्यांपासून दीपिका वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसू लागली आहे. त्यापैकीच एक महत्वाकांक्षी चित्रपट मानला जातो तो महाभारत. या चित्रपटात ती द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारते आहे. मधु मंटेना दिग्दर्शित हा चित्रपट महत्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात असली तरी आता दीपिकाने मात्र या चित्रपटाबद्दल, भूमिकेबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली. दीपिका आपल्या या वर्षातल्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल भरभरून बोलताना दिसते आहे.
दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ सिनेमा १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. दीपिकाने सिनेमात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सुशांतच्या मृत्यू नंतर २०२० हे वर्ष एकूणच वाईट गेल. म्हणूनच त्याचे संकेत म्हणून दीपिकाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून आज पर्यंत पोस्ट केलेले सर्व फोटो काढून टाकले आणि नव्या वर्षात नव्याने फोटो पोस्ट करणं सुरू केलं, जणू ही तिची नव्यानेच सुरूवात असेल.