Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood कोरियोग्राफर गणेश आचार्यची स्मार्ट लूकसोबत दमदार एन्ट्री

कोरियोग्राफर गणेश आचार्यची स्मार्ट लूकसोबत दमदार एन्ट्री

गणेश आचार्यचं हे रुप सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान इथवर पोहोचण्याचा त्याचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. गणेश म्हणालेला, हे माझ्यासाठी अत्यंत कठिण होतं. मी जवळपास दीड वर्षापासून माझ्या शरीरावर काम करत होतो. हे ब्रो या चित्रपटासाठी मी ३०-४० किलो वजन वाढवलं होतं. माझं वजन तेव्हा जवळपास २०० किलोच्या घरात पोहोचलं होतं आता तेच कमी करतोय. विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली आणि गणेशला पाहून प्रेक्षकांसमवेत खुद्द कपिललाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, गणेश आचार्य यानं तब्बल ९८ किलो वजन घटवल्याची माहिती या कार्यक्रमादरम्यान दिली. हे ऐकून कपिलही स्वत:ला रोखू शकला नाही आणि गणेशची वाहवा करत त्यानं या विषयावर विनोदी फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.

नृत्यदिग्दर्शक अर्थात सेलिब्रिटी कोरिओग्राफर गणेश आचार्य हा त्याच्या नृत्यकौशल्यासोबतच त्याचं व्यक्तीमत्त्वं आणि देहयष्टीमुळंही चर्चेत असायचा. स्थुल असूनही नृत्यकलेत इतरांनाही लाजवेल असा त्याचा उत्साह आणि योगदान अगदी कौतुकास्पद. असा हा कोरिओग्राफर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या नव्या रुपामुळं. वजन कमी करण्याचं आपण ठरवलंच होतं, असं सांगत प्रेक्षकांनी गणेश आचार्यला कायम वाढलेल्या वजनात, स्थुल रुपात पाहिलं आहे. त्यामुळं मला हीच प्रतिमा बदलायची होती, असंही तो म्हणाला होता. जिद्द, चिकाटी आणि समर्पकता याच्याच बळावर गणेशने हा प्रवास साध्य करुन दाखवला. ज्याची सर्वच स्तरांतून सध्या प्रशंसा केली जात आहे.

गणेशनी सांगितले कि, सकाळी ३ तास ते जीम आणि स्विमिंग साठी देतात. फ्रुट आणि लिक़्विड डाएट चा ते समावेश त्यांनी आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये केला आहे. रात्री ८ ते सकाळी १२ च्या मध्ये ते जेवण न करता फक्त फळ किंवा ग्रीन टी, सूप किंवा पाणी पिण्यावरच जास्त भर देतात. जर तूमची मेहनत करायची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळणार, असा ठाम विश्वासाने त्यांनी सांगितले. येत्या काळात गणेश ‘देहाती डिस्को’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांसाठी या चित्रपटाच्या निमित्तानं गणेशच्या  नव्या स्मार्ट लूकमध्ये पाहण्याची संधी मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments