Thursday, February 25, 2021
Home Entertainment Bollywood हैप्पी बर्थडे ज्युनिअर बच्चन

हैप्पी बर्थडे ज्युनिअर बच्चन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ३० जून २००० रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता. ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये मुंबईत जन्मलेला अभिषेक अभिनेत्या सोबतच निर्माता, प्लेबॅक सिंगर आणि टीव्ही प्रेजेंटर असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. अभिषेक बच्चनला बालपणी डिसलेक्सिया  आजार झाला होता. आमिर खानने या आजारावर ‘तारे जमीन पर’ सिनेमा तयार केला होता. यामध्ये दर्शिल सफारीने या आजाराने त्रस्त मुलाची भूमिका साकारली होती. या आजारामध्ये शब्द लक्षात ठेवणे, शब्द ओळख नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, लिहिणे, वाचणे आणि बोलण्यातसुध्दा अडथळा निर्माण होतो.

१९७८ मध्ये आलेल्या ‘डॉन’ सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमातील ‘खायके पान बनारसवाला’ गाण्यावर बिग बींनी केलेल्या डान्सची खूप प्रशंसा झाली होती. या डान्ससाठी त्यांनी अभिषेककडून प्रेरणा घेतली होती. झाले असे, की अभिषेक केवळ २ वर्षांचा होता आणि घरी तो फनी डान्स करायचा. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही फनी डान्स स्टेप्स आपल्या गाण्यात घेतल्या. अभिषेक बच्चनने फिल्मी करिअरची सुरुवात २००० मध्ये आलेल्या जेपी दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ सिनेमातून केली आणि त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. परंतु यावर्षीचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. अभिनेत्री करीना कपूरनेसुध्दा फिल्मी करिअरची सुरुवात याच सिनेमातून केली. अभिषेक अभिनेता म्हणून ओळखला जातो, मात्र तो एक निर्मातासुध्दा आहे. त्याने आपल्या प्रॉडक्शनमध्ये ‘पा’सारखा हिट सिनेमा तयार केला. ‘पा’ सिनेमात अमिताभ बच्चन यांनी एका लहान मुलाचे पात्र साकारले होते. या सिनेमाने नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकला होता.

अभिषेक सिनेमांत हवे तसे यश संपादन करू शकला नाही, तसेच त्याला शिक्षणातही यश मिळाले नाही. त्याने दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षणास सुरुवात केली. त्यानंतर मुंबईच्या जमनाबाई नरसी आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये अर्धवट शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून तो स्वित्झर्लंडच्या एका प्रायव्हेट इंग्लिश बोर्डिंग स्कूल ऐग्लोन कॉलेजमध्ये गेला आणि तिथून त्याने शिक्षण पूर्ण केले.

अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त बिग बी अमिताभ बच्चन यांनी लाडक्या मुलाला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी अभिषेकचा हात पकडून फिरायला घेऊन जात आहे, हा लहानपणीचा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिषेक मोठा झाल्यानंतर बिग बी ला हात पकडून घेऊन जात आहे. हा फोटो शेअर करताना बीग बी भावूक झाले आहेत. त्यांनी लिहिले की, “कधी मी याला हात पकडून चालायला शिकवले होते, आज हा माझा हात पकडून फिरायला घेऊन जातो”. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी ही पोस्ट अत्यंत वेगाने व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली असून “लव्ह यू पा.” असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments