Sunday, February 28, 2021
Home Entertainment Bollywood जुग जुग जियो वर कोरोनाचे सावट

जुग जुग जियो वर कोरोनाचे सावट

'जुग जुग जियो' या चित्रपटातील वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक राज मेहता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातील वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक राज मेहता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी शुटींग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत चारही सेलिब्रिटी पूर्णपणे ठिक होत नाहीत, तोपर्यंत ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शुटींग पुन्हा सुरु करण्यात येणार नाही. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन यांच्यासोबत कियारा अडवाणी आणि प्राजक्ता कोळी हे कलाकारही काम करत आहेत.

juj jug jio film crew tested corona positive

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्तींसह शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच नीतू कपूर यांनी चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. तसेच राज मेहता यांचा चित्रपट ‘जुग जुग जियो’ ची शुटींग सुरु होती. फिल्मफेयरने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील तीन मुख्य अॅक्टर्स, वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासह दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अद्याप या सेलिब्रिटींकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘जुग जुग जियो’ चित्रपटात एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे. ज्याची निर्मिती करण जोहर करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. जर नीतू कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं तर, त्याचा आगामी चित्रपट ‘कुली नं १’ लवकरच रिलीज व्हायच्या मार्गावर आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत सारा अली खान दिसणार आहे. आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. असं सांगण्यात येत आहे की, स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपटाचं चित्रिकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व स्टार्स व्यवस्थित बरे होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव कधी येतात आणि पुन्हा शुटींग ला सुरुवात कधी होते याची बाकी टीम वाट बघत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments