Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood जुहीच इअररिंग हरवले, ते कोणाला सापडले ! जुहीचे मदतीसाठी ट्वीट

जुहीच इअररिंग हरवले, ते कोणाला सापडले ! जुहीचे मदतीसाठी ट्वीट

बॉलीवूड,अभिनेता आणि सिनेतारका कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. अभिनेत्री जुही चावला सध्या सिनेमा पासून दूर असली तरी तिच्या हरवलेल्या डायमंड इअररिंग बद्दल केलेल्या ट्वीटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळा वर कुठेतरी तिचा एक डायमंड इअररिंग हरवल्याने ती खूप बैचेन झाली आहे. यावरून त्या वास्तूमध्ये असलेली तिची भावनिक गुंतणूक निदर्शनास येते. जुही चावलाचे मौल्यवान असे डायमंडचे कानातले हरवले आहे व आता ते शोधण्यासाठी तिने सोशल मिडियावर लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. याबाबत तिने एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये तिने कानातल्या जोडीच्या दुसऱ्या इयररिंगचा फोटोही शेअर केला आहे. कधी कधी आपणाकडून गडबडीमध्ये, घाईत असताना गोष्टी हरवतात. या गोष्टी थोड्या महागड्या असल्या तर नक्कीच वाईट वाटते, मात्र या गोष्टी मौल्यवान असल्या आपण मनापासून दुःखी होतो व ती हरवलेली गोष्ट परत मिळवण्यासाठी जितके करता येतील तितके प्रयत्न करतो. आता अशीच अवस्था झाली आहे अभिनेत्री जुही चावलाची.

ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जुही लिहिते, ‘आज सकाळी मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमिराती येथे चेक इन करण्यासाठी टी २, गेट ८ च्या दिशेने ड्राईव्हवेवर प्रणाम बग्गीमध्ये चालत असताना कुठेतरी माझे हिऱ्याचे कानातले पडले. जर कोणी हे शोधण्यासाठी मला मदत करू शकले तर मला खूप आनंद होईल. जर कोणाला मिळाले तर कृपया याबाबत कृपया पोलिसांना कळवा व त्याबाबत तुम्हाला बक्षीस द्यायला मला नक्कीच आवडेल. हरवलेल्या इयररिंगच्या जोडीचा हा दुसरा पीस मी शेअर करत आहे. गेली १५ वर्षांपासून जवळजवळ दररोज मी ही इयररिंग्ज घालत आहे. कृपया मला ते शोधण्यात मदत करा. धन्यवाद. अशाप्रकारे जुही चावला खरोखरच सोशल मीडियाद्वारे चमत्कारची अपेक्षा करत आहे. आपणास वाटेल की ही मोठी गोष्ट नाही, परंतु कदाचित हा फक्त एक दागिना नसून त्यामध्ये जुहीच्या भावना अडकल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तिने सोशल मीडियावरून ही विनंती केली आहे.

काही दिवसांपूर्वी जुही चावलाने व्हिडिओ शेअर केला होता. यावरून ती चर्चेत आली होती. यात ती एअरपोर्टवर दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने खराब व्यवस्थेबाबत एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments