Monday, March 1, 2021
Home Entertainment Bollywood कंगनाला टीवटीव करावी लागली डिलीट

कंगनाला टीवटीव करावी लागली डिलीट

ही तर मानसिक रोगी आहे. शेती काय असते हे तिला माहित तरी आहे का? शेतीत किती कमाई असते ते तरी तिला माहित आहे का? मी तिला दिवसाला शेतात काम करायचे ६००-७०० रुपये देते, तिने कापसाची एक गोणी तरी उचलून दाखवावी.

अभिनेत्री कंगना राणावत आपल्या ट्वीट किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादात असते. यावेळी देखील ती चर्चेत आली ती दिल्ली मध्ये चाललेल्या शेतकरी आंदोलनावरुन. कारण तिने शेतकरी आंदोलनाला केवळ विरोधचं केला नाही तर आंदोलना मध्ये सहभागी असणार्या दोन वृद्ध महिलंविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरले. या ट्वीटमुळे कंगना राणावतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता केलेल्या टीवटीव मुळे तिला हे ट्वीट डिलीट करावे लागले आहे. त्याचप्रमाणे आता कंगनाला या आजीकडून सज्जड दम सूचक प्रत्युत्तरही मिळाले आहे.

deleted kangana ranaut twit

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेली ही वृद्ध महिला सीएएविरोधी आंदोलनात सामील झालेल्या बिलकिस बानू आणि मोहिंदर कौर यांबद्दल मस्करी करत गैर उद्गार काढले आहेत. कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं कि, हि तीच आज्जी आहे जिला भारतातील प्रभावशाली महिला म्हणून स्थान दिले होते. मात्र आत्ता त्या १०० रुपयांसाठी आंदोलनामध्ये येत आहेत. १०० रुपये देऊन आंदोलनासाठी महिला मिळातात. परंतु कंगनाच्या या खोट्या ट्वीटवर तिला इंटरनेट वर ट्रोल करण्यात आले. आणि त्या आज्जी कडून सज्जड दम हि प्रत्युत्तरादाखल मिळाला आहे.

मोहिंदर कौर या पंजाब भटिंडा येथे राहत असून यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींची लग्न झाली असून मुलगा पत्नी आणि मुलांसह माझ्यासोबतच राहतो. मोहिंदर कौर आपल्या घरासाठी स्वत: भाज्या पिकवतात आणि आपल्या शेतीची काळजी स्वत:च घेतात. आज्जीने कंगनाला एक प्रकारे धारेवरच धरले. त्या म्हणाल्या कि अजूनही माझ्यात एवढा उत्साह आहे कि, मी अजूनही दिल्लीला जाऊ शकते. मी एवढी अॅक्टिव्ह आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ शकते. १०० रुपयाने माझे काय होणार आहे? काहीही बोलते. ही तर मानसिक रोगी आहे. शेती काय असते हे तिला माहित तरी आहे का? शेतीत किती कमाई असते ते तरी तिला माहित आहे का? मी तिला दिवसाला शेतात काम करायचे ६००-७०० रुपये देते, तिने कापसाची एक गोणी तरी उचलून दाखवावी. उन्हात, रात्री बेरात्री शेतात घाम गाळल्यावर पैसे मिळतात. शेतीत पैसे कमावणं खूप कठीण असतं. कंगनाने वयाने मोठ्यांप्रमाणेच कोणाबद्दल बोलताना विचारपूर्वक बोलावे, आपली भाषा सांभाळावी, आपण काय बोलतोय याचा विचार करावा. कोणाविषयी वाईट बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा. कोणाविषयी चांगला विचार करायचा नसेल तर ठीक पण वाईटही विचार करु नये. तिने सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करावी.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments