बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हल्ली कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आता कंगनाने कर्नाटकच्या प्रमुख सचिव महिला आयपीएस अधिकारी रुपा मुदगल यांच्यावर अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून टीका केली आहे. आरक्षणाचे दुष्परिणाम. अपात्र व्यक्तीला पद मिळते, तेव्हा ती व्यक्ती जखमा भरत नाही तर त्या जखमांवरची खपली काढण्याचे काम करते. मला त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही माहित नाही, परंतु मी पूर्ण विश्वासाने सांगते कि, त्यांचे नैराश्या त्यांच्या अकार्यक्षमतेवरून जन्मली आहे. पुढे कंगनाने रूपा यांना पोलीस खात्यावरचा धब्बा म्हटले आहे. त्यांना निलंबित केले पाहिजे. असे अधिकारी पोलीसात असणे हि एक लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच त्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.
रूपा मुद्गल या कर्नाटकच्या “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जातात. त्या २००० सालच्या आय पी एस अधिकारी आहेत. २००४ मध्ये त्या अचानक चर्चेमध्ये आल्या. १९९४ च्या हुबळी दंगल प्रकरणी मध्यप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करण्यासाठी गेल्या होत्या. त्या नंतर सोशल मिडीयावर परखडपणे वक्तव्य करण्यात रूपा मुदगल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या अशा रोखठोक स्वभावामुळे आत्तापर्यंत त्यांची ४१ वेळा तरी बदली करण्यात आली आहे.
Side effects of reservations, when unworthy and undeserving gets the power they don’t heal they only hurt, I don’t know anything about her personal life but I guarantee that her frustration is stemming out of her incompetence #BringBackTrueIndology https://t.co/BUrVm1Fjz3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2020
१४ नोव्हेंबर रोजी रूपा मुद्गल यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की फटाके हे भारतीय परंपरेचा भाग नाहीत, त्यांचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात केलेला नाही. आयपीएस अधिकारी रूपा मुद्गल यांच्या या ट्विटनंतर त्यांच्यात आणि लोकप्रिय ट्विटर हँडल ‘ट्रू इंडोलॉजी’ यांच्यात वाद झाला. ट्रू इंडोलॉजी हे पेज हिंदू संस्कृतीबद्दल माहिती देत असते. मात्र आयपीएस अधिकारी रुपा मुद्गल यांनी या पेजवर लोकांना भ्रमित करण्याचा आरोप केला आहे. आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या या वादामुळे ‘ट्रू इंडोलॉजी’चे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. ज्यावर ट्रू इंडोलोजीचे फॉलोअर्स संतप्त झाले आणि त्यांनी रूपा मुद्गल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रुप मुद्गल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्या करण्यात आला आहे. या वादात अभिनेत्री कंगना राणावतने उडी घेउन या विषयावर ट्विट करून लिहिले की, तिला निलंबित केले पाहिजे, असे अधिकारी पोलीस खात्यावर धब्बा आहेत.