मलाइका अरोरा हि अभिनेत्री कायम आपल्या फॅशन, फिटनेस आणि डान्ससाठी चर्चेत असते. मलाइका अरोरा सध्या एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावत होती. त्या कार्यक्रमा अंतर्गत शुटिंग देखील सुरू होते. यादरम्यान या अभिनेत्रीचा एका पेक्षा एक ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतो. स्टायलिश अवतारातील तिचे फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल असतात. वेगवेगळ्या साईट्सवर विविध कपड्यांमधील आकर्षक फोटो शूट बद्दल ती कायम चर्चेत असते. वेस्टर्न त्याचप्रमाणे पारंपारिक वेशभूषेमध्ये सुद्धा ती तेवढीच सुंदर दिसते.
मलाइका स्वतःचे फॅशनेबल फोटो चाहत्यांसोबतही शेअर करत असते. तिच्या मोहक आणि हॉट फोटोंवर चाहते लाइक आणि कमेंट्सचा कायम वर्षाव करताना दिसतात. मलाइका अरोरा बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमा मध्ये सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेच. गोल्डन म्हणजेच सोनेरी रंगांवर तिचे विशेष प्रेम आहे. काही दिवसांपूर्वीच शुटिंग सेटवर देखील तिला अशाच शेड्सच्या आउटफिटमध्ये पाहिलं गेलं. या शॉर्ट ड्रेसमुळे मलाइकाला बोल्ड लुक आला होता. साध्या आणि स्टायलिश ड्रेसमध्ये ती कायमचं हटके दिसते. जसा देश तसा वेश याचे सुद्धा उत्तम उदाहरण तिने शो दरम्यान दाखवून दिले आहे. गणेश चतुर्थी स्पेशल एपिसोडसाठी मलाइकाने पारंपरिक पोषाखाची निवड केली होती. तिनं लाल रंगाची डिझायनर साडी नेसली होती. ज्यावर सोनेरी रंगाच्या धाग्यांचे सुंदर डिझाइन होते. या लुकसह मलाइकाने महाराष्ट्रीयन नथीसह, तिच्या कपाळावर चंद्रकोर देखील दिसत आहे. या मराठमोळ्या लुकमध्येही मलाइका खूपच मोहक दिसत होती.
मलाईकाचे वय ४५ असून या वयातही तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरचे सिक्रेट तिने बर्याचदा सोशल मिडिया वर शेअर केले आहे. त्याबाबतचे फोटोही ती कायम ऑनलाईन शेअर करताना दिसते, त्या फोटोमध्ये तिने स्ट्रेचिंग या व्यायाम पद्धती बद्दल थोडक्यात सांगितले आहे. ती जिममध्ये वेगवेगळ्या एक्सरसाईज करत असतेच त्यामध्ये ती बॉडी स्ट्रेचिंगला खूप महत्व देते. ती सांगते कि, स्ट्रेचिंग हि जरी साधारण वाटणारी एक्सरसाईज असली तरी शरीराला अत्यावश्यक आहे. कोणत्याही वयोमानाची व्यक्ती हि एक्सरसाईज सहज करू शकते. स्ट्रेचिंग मुळे शरीरातील स्नायू स्ट्रेच होऊन स्नायूंच्या वेदना दूर होण्यास मदत होते व शरीराची लवचिकता वाढते. शांत आणि आरामदायी आरोग्य राहण्यासाठी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी स्ट्रेचिंग आणि ध्यानधारणा करावी असे मलाईका आवर्जून सांगते. अनेक तरुणींसाठी ती एक फॅशन आयकॉन आहे, ब-याचं जणी तिचा फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसतात