भारतीय सण आणि सेलिब्रीटीचे सेलिब्रेशन हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. आणि कोणताही सण म्हटला कि, काहीना पारंपारिक वेशभूषा, आभूषणे यांशिवाय अपूरा वाटत असतो. मग यंदा मकर संक्रांती निमित्त काळे कपडे, साडी निवडताना खण, पैठणी किंवा इरकल असे अनेक अस्सल पारंपारिक वस्त्रांच्या पर्याय उपलब्ध आहेत. सध्या इंडो वेस्टर्न कपड्यांचा ट्रेन्ड असल्याने तुम्ही खण, पैठणी, इरकल याचं मोठ कलेक्शन उपलब्ध आहे. आज मकर संक्रांतीचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. देशतील विविध प्रांताप्रमाणे सणाच्या नावात विविधता असली तरी हा सण सर्वत्र अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. सणानिमित्त परंपरेने चालत आलेल्या विधी, पूजा केल्या जातात. पण त्याचबरोबर नटण्या मुरडण्याची हौसही पुरवून घेता येता. एरव्ही अशुभ समजल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला संक्रांती दिवशी विशेष महत्त्व असते. काळ्या रंगाची पैठणी आता सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही बॉर्डर्समध्ये उपलब्ध आहे. सोबतीला पूर्वीप्रमाणे तुम्हांला पैठणीसाठी केवळ सिल्क वर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता हकक्या फुलक्या कॉटन पैठणीचा देखील पर्याय उपलब्ध आहे. काळ्या रंगाचे ड्रेस, साड्या परिधान करुन संक्रांतीच्या सणाचा आनंद घेतला जातो. मराठमोळ्या अभिनेत्रींनी देखील संक्रांती निमित्त खास ब्लॅक साडी लूक शेअर केले आहेत.
मकरसंक्रांती निमित्त ट्वीट करताना महाराष्ट्राचं पारंपारिक वस्त्र समजल्या जाणार्या पैठणीतील एक खास अंदाज उर्मिला मातोंडकर हीने पोस्ट केला आहे. चिंतामणी रंगातील ब्रोकेड काठातील पैठणीमध्ये उर्मिलाचा अस्सल मराठमोळा लुक पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. बॉलिवूडची उर्मिला मातोंडकर हीने आज ट्वीटरच्या माध्यमातून तिळ गूळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, ऋतुजा बागवे, प्रार्थना बेहेरे, भाग्यश्री लिमये, वीणा जगताप या अभिनेत्रींचे सौंदर्य काळ्या रंगाच्या साड्यांमध्ये अधिकच खुलून दिसत आहे.
काळा, पांढरा हे दोन रंग कधीच फॅशन मधून बाहेर जाऊ शकत नाहीत असे आहेत. काळ्या रंगाची पैठणी आता सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही बॉर्डर्समध्ये उपलब्ध आहे. सोबतीला पूर्वीप्रमाणे तुम्हांला पैठणीसाठी केवळ सिल्क वर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता हकक्या फुलक्या कॉटन पैठणीचा देखील पर्याय खुला आहे. खण देखील सध्या पुन्हा फॅशन मध्ये आला आहे. खणामध्ये देखील आता स्त्री- पुरूष दोघांचेही कपडे सहज उपलब्ध आहेत. संक्रांतीच्या निमित्तने अस्सल पारंपारिक अंदाजामध्ये तयार होण्यासाठी खणामध्येही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इरकल देखील पारंपारिक पण कायम ट्रेन्ड मध्ये राहणारा एक प्रकार आहे. इरकल सोबतच खणासोबत काम केलेल्या किंवा कशिदा वर्क मधील काळ्या साड्या संक्रांतीच्या निमित्ताने नक्की ट्राय करू शकतो. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने आपण एखाद्या चांगल्या काळ्या रंगाच्या साडी किंवा ड्रेसमध्ये नक्कीच थोडे पैसे खर्च करणे वावगे ठरणार नाही.