Saturday, March 6, 2021
Home Entertainment सासू सुनेच्या नात्याचा बदलता ट्रेंड

सासू सुनेच्या नात्याचा बदलता ट्रेंड

सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. पूर्वीच्या मालिकांसारखी टिपिकल सासू न दाखवता किंवा सूनसुद्धा समजून उमजून वागणारी दाखवली जाते. त्यामुळे या माध्यमाचा समाजावर किती प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो याचे उदाहरण घरोघरी दिसून येते. सासू आणि सून हे नाते अति नाजूक आणि अति संवेदनशील मानले जाते. यात थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. सर्वसाधारण लग्नाच्या वेळी सुनेचे भरभरून कौतुक करणारी सासू आणि आई किती चांगल्या याचा ढोल पिटणारी सून, मात्र पाठीमागे एकमेकींची उणीदुणी काढतात असे अनेकदा दिसते. मग त्या सासू सुना कोणत्याही आर्थिक स्तरातील असोत. अगदी सेलेब्रिटी सुद्धा त्याला अपवाद नाहीत असे म्हणता येते. पण सून घरात येऊन थोडा काळ होऊनही सासू सुनेचे नाते खूपच जिव्हाळ्याचे असल्याची उदाहरणे आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच. हल्लीच्या मालिकांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या सासू सुनांचे नाते हे खूपच हटके दाखवलेले असते. पूर्वीच्या मालिकांसारखी टिपिकल सासू न दाखवता किंवा सूनसुद्धा समजून उमजून वागणारी दाखवली जाते. मालिका या सर्रास रोजच प्रत्येक घरात पहिल्या जातात, त्यामुळे या माध्यमांचा समाजावर किती प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो याचे उदाहरण घरोघरी दिसून येते. या विषयावर दोन्ही बाजू पाहूया.

आजकालच्या तरुणीं समोर लग्न म्हणजे एक चित्र उभं राहतं, ते म्हणजे मी, माझा नवरा आणि आपला छानसा छोटासा संसार एवढंच. बरं मग मुलाच्या आई वडीलांचे काय ! आता यात पण सगळ्याच तरुणी असा विचार करत नाहीत. घरात कोणी मोठ असेल तर बर होईल, आपल्याला सासू असेल तर, तिचा हातभारही लागेल, सासरच्या नवीन रूढी परंपरा समजण्यास मदत होईल, आपल्या चुका न ओरडता प्रेमाने समजावून सांगेल आणि आपल्याला चांगला मार्गही दाखवेल अशाही काही असतात. आणि त्याच संसारासाठी स्वतःला साखरेप्रमाणे विरघळवून घेतात. आपल्या सासूच्या सुखासाठी तिच्या सारखे वागायचा प्रयत्न करतात आणि आपसूकच तिच्यातले गुण सूनेमध्ये उतरू लागतात. एक घर म्हटलं कि भांड्याला भांड हे लागतेच या म्हणी प्रमाणे सासू सून म्हटले कि शब्दाला शब्द हा लागलाच पाहिजे त्याशिवाय या नात्याची ओळख अधुरीच म्हणायची. मुख्य म्हणजे यांना भांडणासाठी एक विशेष विषयाची गरज नसते. त्या कोणताही शुल्लक गोष्टीवरून सुद्धा भांडू शकता. अगदी जेवणातील मिठापासून  ते सुनेच्या माहेरच्या माणसांपासून  ते सासूच्या जुनाट विचारसरणी पर्यंत आणि एवढ्यातच त्यांच भागत नाही. प्रत्येक भांडणात मागच्या पुढच्या अगदी लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर पडतात.

सुनेने आपल्या सासूकडे एक आईच्या नजरेने पहिले आणि ती जे बोलते ते आपल्या आईच्या मुखातून निघतेय असा विचार केला आणि सासूने आपल्या सुनेचे वागणे मुलीप्रमाणे समजावे,  हा विचार केला तर दोघीही सुखाने नांदतील, संसार आनंदाने फुलेल आणि मुख्य म्हणजे मधल्या मधी होणारे नवर्याचे हाल कमी होतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments