Saturday, March 6, 2021
Home Entertainment मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखची भावनिक पोस्ट

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखची भावनिक पोस्ट

मनाची घुसमट करून घेण्यापेक्षा कधीही मोकळेपणाने मन एखाद्या समोर मांडलेलं कधीही चांगले. त्यामुळे मनात काहीही न बाळगता “स्पीक अप” असा सल्ला मयुरीने दिला आहे.

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हे नाव मराठी सृष्टीमध्ये प्रसिद्ध आहे. विविध मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे आणि सध्या हिंदी मालिकांमध्येही तिची एन्ट्री होत आहे. लॉकडाऊन काळामध्ये तिचा पती आशुतोष भाकरे याने नैराश्येमुळे त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्या धक्क्यातून सावरता सावरता अभिनेत्री मयुरी देशमुख चर्चेत आली ती तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे. सामाजिक कार्यकर्त्या शीतल आमटे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या धक्कादायक घटनेमुळे तिने आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

mayuri deshmukh speaks about sheetal aamte

आमटे कुटुंबिय आणि शीतल यांच्यात मधल्या काळात बरेच वाद उद्भवले होते. मानसिक ताण आणि नैराश्यामुळेच शीतल यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला आहे. मयुरी या व्हिडीओत म्हणते, “शीतल आमटे यांच्या मृत्यूने बसलेला धक्का पचवता येणं कठीण आहे. कारण शीतल आमटे यांनी मधल्या काळात स्वत: माझ्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला. त्यांनी स्वत: मला धीर दिला. माझ्या धीराचे कौतुक केले. त्यानंतर आम्ही फोन नंबर एक्स्चेंज केले. आम्ही एकमेकींशी बोलू लागलो. ओळख नसतानासुद्धा त्यांनी अगदी तुला काहीही गरज भासली तर मी आहे तुझ्या सोबत असे सांगून माझ्या कठीण काळात उभं राहायला मला खूप धीर दिला. आशुतोष असतानाही आमची ओळख नव्हती. पण त्त्यांचे व्हिडीओज मी पाहात होते. त्यांनी नैराश्यातून बाहेर येण्यासाठी केलेली पेंटिंग थेरपी मी पाहिली होती. आशुलाही दाखवली होती. त्यानंतर आमच्यात चांगला परिचय झाला होता. असं असताना त्यांनी आत्महत्येचा घेतलेला निर्णय पूर्णत: अयोग्य आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याच्या बातमीनेसगळा देश  हादरुन गेला. शीतल यांचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मी त्यांना फॉलो करत होते. अशाने त्यांचं जाणं हे मी माझा पर्सनल लॉस मानते.”

लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी विविध माध्यमातून धडपडणाऱ्या शीतल आमटे यांच्यासारख्या व्यक्तीने आत्महत्ये सारख टोकाचं पूल उचलणे ही गोष्ट मनाला पटण्यासारखी नव्हती. पण यावर विचार करताना मयुरी म्हणते, “डिप्रेशन आणि त्याची कारणं वेगवेगळी असतात. त्यात मी आता हात घालणार नाही. पण स्ट्रेंथ या टर्मिनॉलॉजीला आपण खूप चुकीचं डिफाईन केलं आहे. स्ट्रेंथ म्हणजे सगळ्या गोष्टी निमुटपणे सहन करणं. एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्या मोठ्या हुद्द्यावरच्या लोकांवर टाकून ते सगळं नीट करतील असं समज आपण करत असतो. हे एका अर्थाने त्याला गृहीत धरून अपेक्षांचे ओझे त्याच्या डोक्यावर देण्यासारखी गोष्ट आहे. पण स्ट्रेंथ काय असते, तर आपलं काहीतरी बिनसलं आहे ते बिनधोकपणे समोरच्याला सांगता येणं याला स्ट्रेंथ असे म्हणतात. आपले विचार आपल्याला स्पष्ट व्यक्त करता आले पाहिजेत. आपण ओके नाही आहोत हे समोरच्याला सांगता येणं, ते आपण मान्य करणं याला स्ट्रेंथ म्हणतात. म्हणून आपल्या सोबत एक असा माणूस हवा ज्याच्यासमोर आपण मन मोकळ करू शकतो. त्याला सगळं सांगू शकतो. एकदा नाही अनेकदा. पण आपण हे बोलत राहायला हवं. मनाची घुसमट करून घेण्यापेक्षा कधीही मोकळेपणाने मन एखाद्या समोर मांडलेलं कधीही चांगले. त्यामुळे मनात काहीही न बाळगता “स्पीक अप” असा सल्ला मयुरीने दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments