Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood सुशांत सिंह राजपूत विशेष

सुशांत सिंह राजपूत विशेष

सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्र्यामधील राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. सुशांतसारख्या उत्तम अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला, विशेषत: त्याचे चाहते अतिशय निराश झाले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने चाहते त्याचं स्मरण करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्याबाबतच्या आपल्या आठवणी शेअर करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रोफेशनल लाईफशिवाय रिया चक्रवर्तीसोबतचे प्रेमसंबंधही फार चर्चेत होते. लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या सुशांत आणि रियाशी संबंधित प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली होती. त्याच्या मृत्यूनंतर नेपोटिझमचा मुद्दाही समोर आला होता. गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीच्या मते, सुशांत डिप्रेशनमध्ये होता. यानंतर या प्रकरणी ड्रग अँगलही समोर आला. या प्रकरणी रिया चक्रवर्तीने एक महिना तुरुंगवासात राहावं लागलं होतं.

सुशांतने आत्महत्या केली नसून ही हत्या आहे, असा आरोप सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी केला होता. यानंतर देशभरातून सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी होऊ लागली. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु कालांतराने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. परंतु अनेक महिन्यानंतरही सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सीबीआयने म्हटलं आहे की सुशांत सिंह प्रकरणात सर्व पैलू विचारात घेतले जात आहे.

Sushant Singh Rajput birthday

सुशांत आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याचे पहिले रिलेशनशिप मालिका पवित्र रिश्ता मध्ये त्याची सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत राहिले. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही.

दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने आपल्या भावाच्या चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे. सुशांत जगलेल्या आयुष्याचा सोहळा करण्याचे आणि २१ जानेवारी या त्याच्या जन्मदिनी प्रेम वाटून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तिने लिहिलं आहे की, “आपल्याला २१ जानेवारीला सुशांतचा जन्मदिवस कसा साजरा करायला हवा. कोणता सल्ला? तिने पुढे लिहिलं आहे की, “त्याच्या गाण्यांवर डान्स करुन चाहत्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला आवडेल. त्याच्या आयुष्याचा जल्लोष साजरा करुया आणि प्रेम तसंच आनंद पुरवण्यात मदत करा.” सुशांतच्या बहिणीने श्वेताने वर्चुअल इवेंटची योजनाही आखली आहे. तिने चाहत्यांना सुशांतचं आयुष्य आनंदाने साजरं करण्याची विनंती केली. यासोबतच त्याच्या आठवणींचा आदर करण्यासही सांगितलं. सध्या सोशल मीडियावर त्याचे बरेच जुने फोटो आणि त्याच्या सिनेमाचे सीन चाहते व्हायरल करत आहेत. यातूनच ते आपल्या लाडक्या कलाकाराला आदरांजली वाहत आहेत.

सुशांतने अभिषेक कपूरच्या ‘काय पो चे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. नंतर तो शुद्ध देसी रोमान्स, पीके, ब्योमकेश बक्क्षी यांसाह अनेक चित्रपटांत झळकला होता. ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याच्या निधनाच्या दीड महिन्यांनी म्हणजे २४ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज केला गेला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments