Saturday, March 6, 2021
Home Entertainment बॉलीवूड गायिका नेहा कक्कर Pregnant

बॉलीवूड गायिका नेहा कक्कर Pregnant

सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. नेहानं आता तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर रिलीज केलं आहे. तर नेहा आता प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणं हे तिच्या ‘ख्याल रखया कर’ या आगामी गाण्याचं प्रमोशन होतं. नेहाचं हे गाणं येत्या २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ‘ख्याल रखया कर हे नवं गाणं २२ डिसेंबरला येत आहे’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहानं पुन्हा एकदा चाहत्यांना वेडं लावले आहे. तिनं तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी प्रेग्नेंसीच्या बातम्यांचा वापर केला आहे. नेहानं तिच्या आणि रोहनच्या लग्नाआधी असाच पब्लिसिटी स्टंट केला होता. ’नेहू दा व्याह’ या गाण्यात दोघांचं लग्न दाखवण्यात आले होते. त्यानंतर दोघं खरच लग्नबंधनात अडकले. नेहाच्या नेहा कक्कर आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. या लग्नातील प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. लग्नानंतर नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केले होते. नेहाच्या स्वागतासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच प्रकाशझोतात आले होते.

नेहा आणि रोहन यांनी द कपिल शर्मा शो मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट २०२० मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. बॉलिवूड गायिका नेहा कक्करने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. नेहा लवकरच आई होणार आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहनप्रीत सिंगसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला. यात ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोमध्ये नेहाने निळ्या रंगाची डेनिमची डंगरी घातलेली दिसत आहे, बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांनावरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. या फोटोसोबत नेहानं ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं. परंतु या मागचे सत्य बाहेर आल्यावर काही प्रमाणात या पब्लिसिटी स्टंटमुळे नेहाचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर नाराज झाले आहेत आणि त्या पोस्टवर कमेंट करत ते आपला संताप व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments