Friday, February 26, 2021
Home Entertainment नाटकं आत्ता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

नाटकं आत्ता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

श्रेयस तळपदे या उमद्या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना आकाराला आणली आहे. श्रेयस याबद्दल माहिती देताना म्हणाला, ‘फडणवीस साहेबांसोबत झालेल्या त्या बैठकीनंतर माझ्या मनात हा प्रोजेक्ट आकार घेऊ लागला. आता तो तयार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव आहे Nine Rasa. यात सर्व प्रकारची नाटकं, एकांकिका, दीर्घांक लोकांना पाहता येतील. गेले अनेक महिने यावर काम चालू आहे. अनेक जुनी नाटकं आम्ही खास शूट केली आहेत. अशी नाटकं शूट करून सध्या आमच्याकडे जवळपास १०० तासांचा कंटेंट रेडी आहे. यामध्ये नाटकं, एकांकिका, दीर्घांक असं रंगमंचावर सादर होणारं सगळं काही आहे. लोकांना नाटकं पाहता यावीत हा यामागचा हेतू आहे. विशेष बाब अशी की बरेच नामांकित कलाकारांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. या कामी आमची वेगळी टीम आहे. मला अनेक कलाकारांनी आवर्जून मदत केली आहे. सुशांत शेलार, अतुल परचुरे, आनंद इंगळे अशी बरीच नावे यामध्ये आहेत. हा ओटीटी प्लॅटफॉर्म अद्याप आला नाहीय. पण नव्या वर्षात तो नक्की लोकांच्या सेवेत रुजू होईल.

श्रेयसने आपल्या भावाच्या मदतीने हा प्रोजेक्ट उभा केला आहे. नाटकासाठी खास नेपथ्य तयार करून सहा कॅमेरा सेटअप करून ही नाटकं शूट झाली आहेत. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, ‘नाट्यव्यवसाय चालावा याच हेतून मी हे करतोय. या निमित्ताने आम्ही जी नाटकं शूट केली ती नाटकं खरंतर तयार आहेत. एक चक्री मारली की ही नाटकं थिएटरमध्ये सादर करता येतील. त्यालाही आमची ना नाही. कारण, यातून नाटक पुढं गेलं पाहिजे. आम्ही नाटक शूट केलं आता त्यावर आमचाच अधिकार असं आम्ही काहीही केलेलं नाही. उलट आम्हाला वाटतं की या निमित्ताने नाटकं सादर व्हावीत. सामान्य लोकांना परवडेल अशा फीमध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येईल. म्हणजे एका नाटकाचं शेवटचं तिकीट ज्या किमतीचं असतं त्याहीपेक्षा कमी किमतीत त्यांना महिन्याभराचं सबस्क्रिप्शन मिळेल. ज्यात ही कितीही नाटकं कितीही वेळा पाहता येणार आहेत.’

लॉकडाऊनच्या काळात सगळी मनोरंजनसृष्टी ठप्प झाली होती. कलाकार पेचात सापडला होता. नेहमीची देणी, भाडी कशी भरायची यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कलाकारांसाठी, मनोरंजन सृष्टीसाठी काहीतरी केले पाहिजे हे प्रत्येकाला वाटत होतं. पण करायचं काय हे कळत नव्हतं. हि गोष्ट साधारणत: एप्रिल महिन्या मधील असेल , परंतु, यावर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर तात्काळ पावले उचललीच. पण दुसरीकडे त्यावेळी देवेंद्र फडणवीसही यासाठी प्रयत्नशील होते.

देवेंद्र फडणवीस यांनी एका झूम बैठकीचं आयोजन त्यावेळी केलं होतं. त्यात अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सामील झाले होते. त्यात श्रेयस तळपदेही होता. यावेळी श्रेयसने नाटकासाठी एक पर्याय दिला होता. हा पर्याय होता नाटकं रेकॉर्ड करून ती लोकांना दाखवण्याचा. तो पुढे कसा नेमका आकाराला येईल हे सांगता येत नव्हतं. पण श्रेयस आपल्या दिलेल्या संकल्पनेवर ठाम होता. आता त्याने ती संकल्पना सत्यात उतरवली आहे. ही संकल्पना आहे वेबसीरीज, सिनेमे यांप्रमाणे नाटकांनाही ओटीटी प्लॅटफॉर्म देण्याची. ‘फडणवीस साहेबांसोबत झालेल्या त्या बैठकीनंतर माझ्या मनात हा प्रोजेक्ट आकार घेऊ लागला. आता तो तयार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव आहे नाईनरासा. यात सर्व प्रकारची नाटकं, एकांकिका, दीर्घांक लोकांना पाहता येतील. गेले अनेक महिने यावर काम चालू आहे. अनेक जुनी नाटकं आम्ही खास शूट केली आहेत. अशी नाटकं शूट करून सध्या आमच्याकडे जवळपास 100 तासांचा कंटेंट रेडी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments