Saturday, March 6, 2021
Home Entertainment सई लोकूर अडकली लग्न बंधनात

सई लोकूर अडकली लग्न बंधनात

सई लोकूर हे नाव तसे पाहता चर्चेत आले बिग बॉसच्या पहिल्या सीझनमुळे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सई लोकुर आणि पुष्कर जोग यांची मैत्री गाजली. हा कार्यक्रम संपल्यानंतर सई दुसऱ्या कोणत्या नव्या शोमध्ये दिसली नाही. बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात ‘कुछ तो गडबड है’ अशी चर्चाही रंगली होती. झाली आहे. सई लोकूर बिग बॉसच्या घरात अनेकदा पुष्कर सोबतच वावरताना दिसली होती. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करने आयटम सॉंगवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी ‘प्यार बाटने से बढता है’ म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत ती चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळे. सई आता तीर्थदीप रॉय सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. तीर्थदीपसोबत ही लगीनगाठ बांधली जाणार आहे ती सईच्याचं घरात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊन मुळे घरीच अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न होणार आहे. सई लोकुरचे लग्न आज म्हणजेच ३० नोव्हेंबरला आहे. या निमित्ताने लोकुर कुटुंबात लगीनघाई सुरु आहे.

sai lokur husband

लॉकडाऊनमुळे अत्यंत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. सध्या सईच्या हातावर मेंदी रंगली आहे. आणि त्या चर्चा रंगली आहे ती मेंदीमध्ये रेखाटलेल्या कारची. सई लोकुरच्या मेहंदीचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्या फोटो तिच्या हातावर सुंदर नक्षी दिसतेय. पण आश्चर्याचा भाग असा की याच नक्षीमध्ये एक कारचं चित्रं दिसत आहे. अनेकांना सुरुवातीला कळलं नाही की मेहंदी काढताना गाडीचं चित्र तिने का काढलं आहे. आता त्याचा उलगडा झाला आहे. सई लोकुरच्या हातावर कारचं चित्र आलं कारण तिने आपल्या मेहंदी काढणाऱ्या मैत्रिणीला या मेहंदीत गाडी काढण्याची विनंती केली. याला कारण सईचे आई-वडील ठरले आहेत. लोकुर कुटुंबियांनी हे लग्न थाटात करायचं ठरवलं आहेच. पण लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाची भीती असल्याने सर्व नियम पाळूनच हे लग्न होत आहे. या लग्नात सईच्या आई वडिलांनी सईला वेरना ही गाडी भेट दिली आहे. आणि या कार मधूनच सईची पाठवणी व्हावी अशी तिच्या आई वडिलांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर तिने कारची डिझाईन मेहंदी मध्ये रेखाटली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments