सैफ अली खानने आदिपुरुष चित्रपटाबद्दल सीताहरणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियाच्या विविध माध्यामातून मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल करण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने म्हटलं आहे की, “आगामी आदिपुरुष चित्रपट रामायणावर आधारित असून सैफ रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं या चित्रपटात रावणाची बाजू दाखवण्यात येईल. रावणाबद्दल भूमिका मांडताना सैफनं अशी काही वक्तव्य केली की त्यामुळं त्याच्यावर टीका केली जात आहे. ‘रावणाला आपण केवळ खलनायक म्हणूनच पाहात आलो आहोत. पण तो खरचं खलनायक होता की नाही. तो देखील एक माणूसच होता’, असं सैफनं म्हटलं आहे. आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचं एक दयाळू आणि मानवतावादी रुप प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापले होते. त्यांनंतर त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाच्या या भूमिकेला चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.” याच सैफच्या वक्तव्यावरून वादंग माजला आहे.
भाजप नेते राम कदम यांनी सैफ अली खानच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या चर्चा सुरू आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी २०२१ पासून सुरु होणार असून हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित करणार आहेत. राम कदम म्हणाले की, रावण नायक कधीच होऊ शकत नाही. निर्मात्यांनी हिंदूंच्या भावना न दुखावता हा चित्रपट बनवावा. रामाची आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्माची होती. अधर्माला अशा प्रकारे नायक म्हणून प्रस्थापित करता येणार नाही. ‘बाहुबली’ चित्रपटातून खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आलेला आणि सुपरस्टार बनलेला प्रभास आणि सैफ अली खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. सैफनं केलेले हे वक्तव्य टीका होत असल्याचं पाहून सैफनं मीडियासमोर येऊन त्याचं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती दिली आहे.
ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याने चित्रपटाविषयी अगदी बारीक सारीक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: ओमनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट थ्रीडी अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून, भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.