गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणते नवीन गाणे घेऊन येत आहे, या तिच्या सरप्राईजची चाहतेवर्ग उत्साहाने वाट बघत आहेत. सावनी सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय इंस्टाग्रामवरही तिच्या फॉलोअर्सचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक संगीतमय भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ”२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचे होते. कोरोनासारख्या महाभयंकर महामारी मुळे जनजीवन विसकळीत होऊन भयंकर निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षाचा शेवटं गोड करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूुब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यां प्रतीचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.
सावनी रविंद्र अशा वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याबाबत सांगते, “फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजू व्यक्तिच्या चेह-यावर हसु फुलवावे, आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प सोडला. जो दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.” यंदा आपला वाढदिवस सावनीने मुंबईतल्या ‘सुलभा स्पेशल स्कुल’ मध्ये जाऊन साजरा केला. वाढदिवसाला सुलभा स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, “खरं तर मी ह्या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली. त्यांचे निखळ हास्य माझ्या वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत करून गेला. त्यांनी दिलेली ऊर्जा आता वर्षभर चांगले काम करण्याची उमेद मला देत राहिल.”