Friday, February 26, 2021
Home Entertainment शरद केळकरचे इंस्टावर ५ लाखच्या वर फॉलोअर्स

शरद केळकरचे इंस्टावर ५ लाखच्या वर फॉलोअर्स

शरद केळकर याची कारकीर्द टेलीविजन मालिकांपासून सुरु होऊन मराठी त्याचप्रमाणे हिंदी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये प्रसिद्ध सिने कलाकार आहे. शरद केळकर यांची लय भारी, बाहुबली, तान्हाजी द अनसंग वॉरिअर आणि हल्ली रिलीज झालेल्या लक्ष्मी या सिनेमा बद्दल चर्चा आहे. अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला पडद्यावर विशेष प्रेक्षकांची पसंती लाभली नाही. त्याबद्दल त्याला बर्याच नाराजागीला सामोरे जावे लागले. त्यावर त्याने आपल्या लक्ष्मी सिनेमा बद्दल मत प्रदर्शित केले आहे. त्याने पुढे म्हटले आहे कि, लक्ष्मी हा चित्रपट समीक्षकांना आवडला नाही. पण माझा चित्रपट त्यांच्यासाठी नाहीच. मी तर सामान्य लोकांसाठी आणि त्यांच्या खर्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल आधारित सिनेमे करतो. परंतु सिनेरसिकांना हा सिनेमा जेवढा आवडलेला नाही तेवढे या चित्रपटातलं लक्ष्मी ही भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरच्या कामाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्याचा फायदा शरद केळकरला त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंट ला पाहायला मिळाला. प्रेक्षक कधी सिने कलाकारांना डोक्यावर उचलून घेतील याचा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला. त्याच्या फॉलोअर्सनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे.

आपल्या सर्व चाहत्त्यांचे आभार मानून त्याने आपला आनंद फोटोसकट शेअर केला आहे. लक्ष्मी सिनेमातील भूमिकेमुळे शरदला सर्वच स्तरातून शाबासकी मिळते आहे. या भूमिकेबद्दल शरद म्हणतो कि, लक्ष्मी चित्रपटातली साकारणं अवघड होतं.त्यामध्ये खूप विविधता होत्यात. पण वेगळी  भूमिका करण्याच तितकंच समाधान  होते. म्हणूनच हा चित्रपट बघून आलेल्या लोकांची चित्रपटाबद्दलची मतं काहीही असोत. पण माझ्या कामाबद्दल सर्वांचं एकमत होतं आहे. त्यांच्या या कौतुकाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. शिवाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आणि अक्षयकुमार सर्वांचाच मी आभारी आहे.

शरद केळकरने यापूर्वी सुद्धा केलेल्या चित्रपटांची कायम चर्चा राहिली आहे. त्यामधील लय भारी मधील संग्राम, बाहुबालीमधील प्रभासच्या अमरेंद्र आणि महेंद्र या दोन्ही व्यक्तिरेखांना आवाज डबिंग करून दिला होता. त्यानंतर तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमा मध्ये शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत दिसला होता. या सिनेमाच्या वेळी सुद्धा एका पत्रकाराने शिवाजी महाराजंचा एकेरी मध्ये उल्लेख केला असता, त्यावर त्याने ती चूक तत्काळ लक्षात आणून देऊन छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याचे सुचविले. तेंव्हाही अनेक जणांनी सोशल मिडीयावर त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. परंतु, परदेशामध्ये कोरोन काळात सुद्धा लक्ष्मी सिनेमाला प्रेक्षकांची पसंती लाभली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments