Friday, February 26, 2021
Home Entertainment Bollywood कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री

कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री

शिल्पा शिरोडकर या बॉलिवूड अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कोरोना लस घेत याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच तिने नवीन वर्षाचं सकारात्मकतेने स्वागत केलं आहे. सध्या त्याचे चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिल्पानं फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये आपण कोरोनाची लस घेतली असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती तिने दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.  शिवाय युएई या देशाचे तिनं आभारही मानले.  २०२० वरच आणि कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनाला आलेला वेग पाहता आतापर्यंत अनेक राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या लसींना परवानगी देण्यात आली आहे. तर, काही राष्ट्रांमध्ये कोरोना लसींच्या लसीकरणासही सुरुवात झाली आहे. शिल्पा सध्या युएईमध्येच स्थायिक असल्यामुळं ही लस घेणं तिला सहज शक्य झाले आहे.

देशात येत्या काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. पण, यातही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही लस केव्हा आणि कशी पोहोचणार याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशी परिस्थिती असतानाच एका बॉलिवूड अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपण लस घेतल्याचं जाहीर केलं. पूर्ण जगाने २०२० हे वर्ष कोरोनाच्या दहशतीत घालवलं. आता लोक या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरु देखील झाली. शिल्पाने दुबईतून ही पोस्ट शेअर केली. या फोटोत तिच्या हातावर मेडिकल टेप आणि कापूस लावलेला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, सुरक्षित लसीकरण, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.. थँक्यू यूएई. या फोटोत शिल्पाने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेन्ट केली असून तिचं भरभरून कौतुकही केले आहे. एका चाहत्याने त्याच्या पोस्टवर कमेन्ट करत लिहिले की, तुम्हाला लस मिळाली? आम्हाला त्याचे अपडेट देत रहा. अशा प्रकारच्या सकारात्मक पोस्टमुळे नक्कीच  देशातील नागरिकांची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही.

shilpa shirodkar

शिल्पा शिरोडकर हीची कारकीर्द पाहता, मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेची विजेती, अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिची बहीण आहे. या दोन्ही बहिणींनी कलाविश्वात एकाच सुमारास पदार्पण केलं होतं. पण, पुढं शिल्पानं चित्रपटांची वाट निवडली तर, नम्रता शिरोडकर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. शिल्पाने आतापर्यंत ‘किशन कन्हैया’, ‘त्रिनेत्र’, ‘हम, दिल ही तो है’, ‘आँखें’, ‘पहचान’, ‘गोपी किशन’, ‘मृत्युदंड’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिल्पाने वर्ष २००० मध्ये यूकेस्थित बँकर अपरेश रंजीतशी लग्न केलं. यानंतर ती कुटुंबासोबत दुबईत राहत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments