Saturday, March 6, 2021
Home Entertainment सोनाली कुलकर्णीचे धमाकेदार न्यू इअर प्रॉमिस

सोनाली कुलकर्णीचे धमाकेदार न्यू इअर प्रॉमिस

नटरंग, पोस्टर गर्ल, अजिंठा, हिरकणी अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र आता एक नवा निश्चय केला आहे. तो असा की ती यापुढे कोणत्याही पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाही. सोनाली कुलकर्णी सध्या एका डान्स रियालिटी शोची परीक्षक होती. त्याच्या अंतिम सोहळ्यावेळी सोनालीने हा केलेला निश्चय जाहीर केला. तिच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.

ती पुढे म्ह्णाली कि, भले आपल्या सिनेमात हिंदी सिनेमात असते तशी रोशणाई नसेल, भले आपले सिनेमे त्यांच्यासारखे ग्लॅमरस नसतील. पण आपल्या सिनेमात आशय असतो. आपले सिनेमे हे जास्त जगण्याजवळचे असतात. आपले सिनेमे रंजन करतात पण त्याचसोबत ते डोळ्यात अंजनही घालतात. मराठी सिनेमाची बात न्यारीचं असते. पण बऱ्याचदा काही बाबतीत मराठी चित्रपटाला हिंदीची कास धरताना सिनेरसिकांनी पाहिलं आहे. बऱ्याचदा हिंदीतला गाण्याचा ट्रेंड मराठीत येतो. हिंदीतला ताल मराठी गाण्यात आलेला दिसतो. हिंदी गाण्यात असलेली भाषेची सरमिसळ मराठीतही येते. इतकच काय, बऱ्याचदा मराठी चित्रपटांची गाणीही पूर्णपणे हिंदी असतात.

असाच काहीसा भाग आहे या गाण्यावर नाचणाऱ्या कलाकारांचा. पुरस्कार सोहळे असो किंवा इव्हेंट्स असो, बऱ्याचदा मराठी तारकांना हिंदी गाण्यांवर नृत्य करावं लागतं. मराठी तारका हे नृत्य तितकंच उठावदार करतात यामध्ये जराही वाद नाही. पण त्यानंतर मग नायिका मराठी असेल तर हिंदी गाण्यांवर नृत्य का करते ? असा सवाल सोशल मीडियावर वारंवार विचारला जातो. अशा प्रश्नांना आता अभिनेत्री, अप्सरा सोनाली कुलकर्णीने उत्तर दिले आहे.

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट दिले. आता मराठी मधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावारुपाला आली आहे. सध्या सोनाली कुलकर्णी लगीनघाईत आहे. ती येत्या काही दिवसात दुबईस्थित तिचा मित्र कुणाल याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे. सोनालीच्या या निर्णयाने मात्र तिच्यात असलेला मराठी भाषेबद्दलचा आदर तिने दाखवून दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments