सोशल मिडीयावर हल्ली सर्वच सेलेब्रिटी कार्यरत असतात. आणि विशेषत: कोरोन काळात भरपूर वेळही उपलब्ध झाल्याने सक्रीयतेच्या प्रमाणात नक्कीच वाढ झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ खर्ची करावा यालाही काही मर्यादा असते. लॉकडाऊन काळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या या अभिनेत्यानं आता मात्र या संपूर्ण वर्तुळापासून अर्थात सोशल मीडियापासून दुरावा पत्करला आहे. यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पण सुयश टिळकच्या मागच्या तीन इन्स्टाग्राम पोस्ट मात्र बरंच बोलून गेल्या आहेत. सोशल मीडियावर या पोस्टनंतर थेट त्यानं आणखी एका पोस्टच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या सोशल विश्वालाच अलविदा केल्याचं पाहायला मिळत आहे. खलील गिब्रान यांच्या ओळी पोस्ट करत त्यानं जणू त्याच्या मनातील भावना इथं मांडल्या आहेत. त्याच असं लिहिलंय, प्रवास करा आणि कुणालाही सांगू नका. एख निखळ अशी प्रेमकहाणी जगा, कुणालाही सांगू नका, आनंदी आयुष्य जगा कुणालाही सांगू नका. माणसं चांगल्या गोष्टींचा नाश करतात.
मालिका विश्वापासून ते अगदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही झळकलेला एक मराठमोळा अभिनेता फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला. फक्त अभिनयामुळेच नव्हे, तर त्याच्यातील इतरही काही सुप्त गुणांमुळे तो अनेक कलाकारांच्या गर्दीतही त्याचं वेगळेपण सिद्ध करु पाहात होता. यात तो यशस्वीही झाला. फोटोग्राफी ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड, सोशल मीडियावर त्याची प्रत्येक पोस्ट एकदम क्रिएटिव्ह. अगदी त्याच स्वयंपाक कौशल्यही सोशल मीडियाद्वारे आपण पहिले.
‘योग्य आणि अयोग्यतेच्या पलीकडेही एक मोकळं रान आहे. मी तुम्हाला तिथेच भेटेन’. रुमीची ही ओळ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यानं थेट शब्दांत काही गोष्टी स्पष्ट केल्याचं जाणवतं. मला जे वाटतं ते मी करतो, जे वाटतं ते बोलतो. यादरम्यान काहीच नसतं. लोकं एकतर तुमच्यावर प्रेम करतील किंवा तुमचा राग करतील, ही त्याची आणखी एक पोस्ट. सुयशनं सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्यामुळे याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे. सोशल मिडिया हे माध्यम सेलिब्रिटीसाठी एक उत्तम पर्याय असतो मुव्ही किंवा नाटकाचे प्रमोशन करण्यासाठी परन्तु, आपली पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य हे कायम वेगळेच ठेवलेलं बर! एखाद्या सेलिब्रिटीनं या वर्तुळापासून लांब जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळं सुयश टिळकच्या या निर्णयाचंही चाहत्यांनी खुलेआम स्वागतच केल्याचं पाहायला मिळालं.