Saturday, March 6, 2021
Home Entertainment प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदे बनला ट्रान्सवूमन

प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदे बनला ट्रान्सवूमन

डिझायनर स्वप्नील शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नीलने आता स्वत:चं नाव बदलून साईशा ठेवलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदेमध्ये झालेल्या एका बदलामुळे सर्वजण आश्यर्यचकीत झालं आहे. तो बदल आहे ट्रान्सवूमन होण्याचा.

स्वप्नीलला साईशाच्या रुपात पाहणंही बॉलिवूडकरांना अतिशय आवडलं आहे. साईशा आता तेवढीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. साईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो.  या कारणामुळे स्वप्नीलने स्वत:ची सर्जरी करुन घेतली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून सायशा या क्षणाची वाट पाहत होती मात्र अनेक कारणांनी तिचं हे स्वप्न पुढे पुढे जात होतं. मात्र सर्वांसाठी त्रासदायक ठरलेला हा लॉकडाऊन सायशासाठी मात्र वरदान ठरला आहे. स्वप्निलची रखडलेली शस्त्रक्रिया या लॉकडाऊनमध्ये पार पडली. स्वप्निल उर्फ सायशा शिंदे ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून तिने बॉलिवूडमधील सर्व टॉपच्या अभिनेत्रींसाठी कपडे डिझाईन केलेले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर फोटो व पोस्ट शेअर करत तिने लिंगबदलाबद्दल जाहीर केले आहे. त्यानंतर एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सायशाने या शस्त्रक्रियेनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याचे सांगितले आहे. ‘ज्या दिवशी मी ब्रा व हाय हिल्स घातले त्या दिवसानंतर माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले. त्याआधी मी फक्त चार भिंतीच्या आत व बाथरुममध्येच महिलांचे कपडे घालायचे. आता मी ते सर्वांदेखत घालू शकते’, असे सायशा सांगते.

सहा वर्षांपूर्वी सायशाला तिच्यातील वेगळेपणाची जाणीव झाली. तेव्हापासून तिचा हा बदलाचा प्रवास सुरू झाला. सहा वर्षापूर्वी मी हे मान्य केले मी पुरुष नाही. मी गे नाही. मी ट्रान्सवुमन आहे. एका पुरुषाच्या शरीरात बाई लपलेली आहे. त्यामुळे तुमचे बाहेरील वागणे तुमच्या अंतर्गत भावनांना नाही दाबून ठेवू शकत. त्यामुळे मला एका ट्रान्सवुमन म्हणूनच ओळखले जावे असे मला वाटायचे. मी अनेकदा शस्त्रक्रियेचा विचार केला. मात्र प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने ते लांबत गेलं. कुणी म्हणायचं की तु किती हँडसम आहेस, मुलगी बनू नकोस. तर कुणी समाजाची भीती दाखवायचे. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्व आपआपल्या घरात अडकले व तिथेच मला संधी मिळाली. या लॉकडाऊनमध्ये माझा नवीन जन्म झाला आहे असे सायशाने सांगितले.

मला माझ्या आई वडिलांची काय प्रतिक्रीया असेल याचं टेन्शन होतं. मी एका सामान्य महाराष्ट्रीय कुटुंबातून आलो आहे. पण जेव्हा मी आई वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. वडिलांनी तर खर्च किती होईल, कुठला डॉक्टर शोधला याबाबत विचारले. तसेच शस्त्रक्रियेनंतर नाव बदलल्यास प्रॉपर्टी पेपर्सवर देखील नाव बदलावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. त्यांचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. पण त्यांनी माझ्यासाठी हे खूप सोप्पे करून दिले होते’, असे साय़शा म्हणाली. शेवटी कोणत्याही गोष्टीमध्ये कुटुंबाचे सहकार्य नक्कीच आत्मविश्वास वाढविते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments