Monday, March 1, 2021
Home Entertainment Bollywood तांडव वेब सीरीज वाद पुन्हा उफाळला

तांडव वेब सीरीज वाद पुन्हा उफाळला

गेल्या आठवड्यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वर प्रसिद्ध झालेल्या वेबमालिकेत हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या ठपका दिग्दर्शकांवर ठेवण्यात आला आहे. अभिनेता सैफ अली खान अभिनीत या वेब सीरिजवर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान ‘तांडव’शी संबंधित कोणत्याही कलाकार किंवा अन्य व्यक्तीने अद्याप कोणतेही विधान प्रसिद्ध केलेले नाही. वाढत्या राजकीय वादावादी आणि पोलिसांच्या तक्रारीत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने देखील या प्रकरणावर मौन बाळगले आहे.

तांडव वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका विद्यापीठाच्या नाटकामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत असलेल्या जीशान अयूबला नारदाच्या भूमिकेतील व्यक्ती म्हणते की, “भगवान, काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतंय की, आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी.” त्यावर जीशान अयूब म्हणतो, “मग काय करु, बदलू का?” त्यावर नारद पुन्हा म्हणतो, “भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.” या दृष्याला अनेक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आणखी एका दृष्यालाही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असून त्या दृष्याच्या माध्यमातून दलित विरोधी विचार दाखवल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकरणावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कमेन्ट करण्यात येत असून या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर लगेचच #BanTandavNow  हा हॅशटॅगही ट्रेन्ड सुरु झाला.

tandav web series

तांडव वेबसीरिजवरुन सध्या वाद पुन्हा उफाळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या वतीनं माफी मागितली आहे. ते म्हणाले की, त्यांचा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा, किंवा कोणताही धर्म आणि राजकीय पक्षांचा अपमान करण्याचाही नव्हता.  त्यावर दिग्दर्शक  विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मी बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. याअंतर्गत, कोणीही काहीही बोलू किंवा तयार करू शकतो. मात्र, हे स्वातंत्र्य तेव्हा चुकीचे ठरते जेव्हा जाणीवपूर्वक मोहीम राबवून एखादा देश, संस्कृती अथाव गटाविरूद्ध वापरले जाते. आता मला खात्री पटत आहे, की या सर्व गोष्टी एका डिझाइन केल्याप्रमाणे घडत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मला एक राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात आहे आणि यासाठी तिथं बसलेले एक्जीक्यूटिव जबाबदार आहेत.

‘तांडव’मध्ये चित्रित केलेल्या गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त करताना विवेक विचारतात, “शेतकरी आंदोलन, शाहीन बाग, दलित चळवळ, लिंचिंग यासारख्या घटना भारतात घडतात का? अशा गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवून बहुसंख्य समाजाला खिजवणे, त्यांचा विश्वास खंडित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे, जर तुम्ही डावी भाषा बोलत असाल तर ओटीटीचे अधिकारी तुम्हाला सहजपणे काम देतील आणि जर तुम्ही राष्ट्राची भाषा बोलू लागला आणि बहुसंख्यां विषयी बोलू इच्छित असाल तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार नाही.” त्यामुळे पुढे हे प्रकरण काय वळण घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments