Sunday, February 28, 2021
Home Entertainment द कपिल शर्मा शो करणार प्रेक्षकांना अलविदा

द कपिल शर्मा शो करणार प्रेक्षकांना अलविदा

द कपिल शर्मा शो  हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना अलविदा करणार आहे. हा कार्यक्रम जरी पुढील महिन्यात बंद होणार असला तरीही यामागची कारणं मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. निर्मिती संस्था आणि वाहिनीनं अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणा नंतर हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल शर्माच्या सूत्रसंचालनात साकारला जाणाऱ्या या कार्यक्रमातून किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, अर्चना पूरण सिंह असे अन्य कलाकारही झळकतात. पण, फेब्रुवारी महिन्यापासून मात्र हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. २०१८ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाच्या दिमाखदार कामगिरीनंतर आता काही काळासाठी अल्पविराम मिळणार आहे. कोरोना काळामध्ये साधारण वर्षभर सर्व व्यवहार ठप्पचं झाले आहेत. त्यामुळेचित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाणदेखील खूपच कमी आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारही पुर्वीसारखे चित्रपटाच्या प्रमोशन साठी शोमध्ये सक्रीय होत नाही आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी सध्या या शोसाठी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोदवीर कपिल शर्मा यानं कायमच चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे. कॉमेडी नाईट्स किंवा मग सध्या सुरु असणारा द कपिल शर्मा शो, प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलनं आपली वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे. असा हा विनोदवीर आता मात्र काही काळासाठी चाहत्यांचा निरोप घेणार आहे. सध्या मात्र कोरोना काळामुळे प्रेक्षकांची उपस्थितीही बोटावर मोजण्यासारखी आहे, चित्रपटही बेतानंच प्रदर्शित केले जात असल्यामुळं कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती कमीच आहे. त्यामुळं आता कार्यक्रमाला अल्पविराम देत काही काळानंतर परिस्थिती पूर्ववत आल्यानंतरच पुन्हा कार्यक्रम सुरु करण्याचा विचार केला जाईल. काही काळासाठी का असेना, पण कपिल शर्मा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळं चाहत्यांध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र कपिलच्या चाहत्यांनी निराश व्हायची गरज नाहीय. कारण वृत्तानुसार, हा कॉमेडी शो नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर लवकरच परतणार आहे. मात्र यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शोचे चित्रीकरण मध्यंतरी थांबले होते. जुलै २०२० मध्ये पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली खरी मात्र तेव्हा स्टुडिओत प्रेक्षक नव्हते. लाइव्ह प्रेक्षकांऐवजी कटआउट्स ठेऊन शूटिंग केले जात होते. हा शो सध्या वीकेंडला टेलीकास्ट होतो आहे.

त्याचप्रमाणे, कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर २० कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे, परंतु त्यानंतर त्याने ही मस्करी असल्याचे स्पष्ट केले. कपिल आणि त्यांची पत्नी गिन्नी आपल्या दुसर्‍या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कपिलला सध्या पत्नीसोबत क्वालिटी वेळ घालवायचा आहे. तोपर्यंत शोमध्ये अधिक मनोरंजक मसालादेखील मिळेल. जेव्हा सर्व गोष्टी सामान्य होतील, तेव्हा शो देखील नव्या रुपात परत येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments