Thursday, February 25, 2021
Home Entertainment Bollywood सोनू आमचा तुझ्यावर भरवसा हाय !

सोनू आमचा तुझ्यावर भरवसा हाय !

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोणाच्याही मदतीसाठी तत्पर असतो. कोरोना काळात त्याने ज्या प्रकारे सर्वसामान्य जनतेची मदत केली ती कोणत्याही सरकारलाही जमली नाही. अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची मदत केली होती. त्याने दिल्ली, मुंबई आणि इतर शहरात फसलेल्या मजुरांची मदत केली होती. स्वत: च्या खर्चातून त्यांना त्यांच्या घरी पोहचवलं होतं. त्यानंतर सोनू सूदकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मदत मागितली. कुणाचे ऑपरेशन असो वा काही अडचणी असो, सोनू सूदने काही ना काही प्रमाणात मदतीची मागणी करणाऱ्यांची मदत केली आहे.

मध्यंतरी कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनू सूदने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले. मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या कोपरगावातील गरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद याने प्रत्येकी दहा हजार रुपयांचे मोबाईल वाटले होते. लॉकडाऊन नंतर शाळा सुरू झाल्या मात्र त्याही ऑनलाईन. मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद याने मोबाईलचे वाटप केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे कोणीही मदत मागतात. नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असणा-या सोनू सूदला माकडांच्या उच्छादामुळे हैराण झालेल्या एका गावाने त्या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आता उच्छाद मांडणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली आहे. सोनू सूदने त्याचीही तयारी दाखवली आहे. ट्विटरवर उत्तर प्रदेशमधील जांस, सोहसा मठिया या क्षेत्रातल्या बासु गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने सोनू सूदला टॅग करताना सांगितलं की त्याच्या गावात माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. आता या माकडांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना दूर कुठेतरी जंगलात नेवून सोडावे अशी मागणी त्या व्यक्तीने सोनू सूदकडे केली आणि त्याच्याकडून मदत मागितली. त्यावर सोनू सूदने मजेदार उत्तर दिले आहे. सोनू सूद याला रिप्लाय देताना म्हणाला की, “बास, आता माकडांना पकडायचं तेवढं राहीलं होतं मित्रा. पत्ता सांग, हे पण करुन पाहतो.” बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सर्वांसाठी रील लाईफ हिरो पासून रियल लाईफ हिरो ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments