Monday, March 1, 2021
Home Entertainment वनिता खरातने केला न्यू इअर न्यूड शूट

वनिता खरातने केला न्यू इअर न्यूड शूट

वनिता खरातने शेअर केलेला हा फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. नवं वर्ष, नवा संकल्प असं अनेकांच असतं. नव्या वर्षात नवीन काही तरी करायचा प्रत्येकाचा संकल्प असतो. या नव्या संकल्पाला अभिनेत्री वनिता खरातने सुरूवात केली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की, ‘मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास,  मला माझ्या शरीरावर अभिमान आहे, कारण मी मी आहे..!!!

मराठी अभिनेत्री वनिता खरातने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. २०१९ मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी वनिता सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मात्र, सध्या वनिताच्या नावाची चर्चा सुरू आहे ती, तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे. वनिता खरातने एका कॅलेंडरकरीता हे फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. कारण वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं कळतंय. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. Body Positivity असा हॅशटॅग वापरत वनिताने हा फोटो शेअर केला आहे. वनिता खरातची लक्षवेधी भूमिका राहिली ती “कबीर सिंग’ या सिनेमात. या सिनेमात वनिताने शाहीद कपूरच्या नोकर महिलेची भूमिका साकारली आहे. लोकप्रिय होण्याकरता एक सीनच काफी असतो हे वाक्य वनिताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच वनिताने हास्य जत्रा  या कॉमेडी शोमध्ये देखील धमाल उडवली आहे.

vanita kharat in saree

वनिताने बॉडीशेम करणाऱ्यांना हे फोटोशूट करून संदेश दिला आहे. त्याचबरोबर #bodypositivity असा हॅशटॅगही वनिताने वापरला आहे. तिचं मराठी कलाकारांकडून आणि सोशल मीडियावर कौतूक होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही वनिताचं या फोटोशूटबद्दल कौतूक केलं आहे. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचे “अशा” प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments