बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, मास्टर या चित्रपटाने तामिळनाडूत २३ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. केरळ आणि कर्नाटकात चित्रपटाचा प्रत्येकी तीन तीन कोटींचा व्यवसाय झाला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बेल्टमध्ये ‘मास्टर’ने साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याचबरोबर उर्वरित देशात दीड कोटींहून अधिकचा व्यवसाय चित्रपटाने केला आहे. या सर्वाखेरीज या चित्रपटाने ओवरसीज मार्केटमध्ये ४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. मास्टरच्या ग्रॅण्ड रिलीजनंतर व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर लिहिले, “बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आली आहे. मास्टर या चित्रपटाची एक जबरदस्त सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना जे पहायचे आहे ते तुम्ही द्या, प्रेक्षक कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत. मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती बघणे कधीच थांबणार नाही.’ या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपती यांच्या व्यतिरिक्त मालविका मोहनन, शांतनु भाग्यराज, अर्जुन दास आणि नसीर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि सहलेखक रत्न कुमार यांनी या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स दिला आहे.
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थालापती विजय आणि विजय सेतुपती स्टारर अॅक्शन-थ्रीलर फिल्म ‘मास्टर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त लीड मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात ४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कोरोना काळातील हा पहिला चित्रपट आहे, ज्याला एवढ्या प्रमाणात यश मिळाले आहे. लोकेश कानगराज दिग्दर्शित हा चित्रपट बुधवारी तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. याचे हिंदी व्हर्जन गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.
फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ कारेल म्हणते की हा चित्रपट राज्यात ५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील मालकांचे म्हणणे आहे की बहुतेक चित्रपटगृहे उघडण्याच्या पहिल्या काही तासांत सर्व तिकिटे विकली गेली. सर्व तरुण सकाळी नऊ वाजता चित्रपटाच्या पहिल्या कार्यक्रमासाठी थिएटरसमोर उभे होते. कोची येथे अभिनेता विजयच्या चाहत्यांनी त्याच्या मोठ्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केला. बरीच चित्रपटगृहांमध्ये त्यांना दुरुस्ती व संसर्गापासून मुक्त करण्याचे काम सुरू आहे. चित्रपटगृहांमध्ये केवळ ५० टक्के जागा भरल्या जातील अर्थात प्रत्येक प्रेक्षकांमधील एक जागा रिक्त ठेवली जाईल. कोविड-९ शी संबंधित खबरदारीचे प्रोटोकॉलचे देखील पालन केले जाईल.