Sunday, March 7, 2021
Home Entertainment आत्ता बूक माय शो वर पहा ऑनलाईन मुव्ही

आत्ता बूक माय शो वर पहा ऑनलाईन मुव्ही

बूक माय शो वरुन आपण अनेकदा ऑनलाईन मूव्ही तिकीट बुक केलं असेल पण आता या प्लॅटफॉर्म वर स्ट्रीम सर्व्हिस सुरू झाली आहे. बुक माय शो ने आपली नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू केली असून आता या App वर युजर्सला ऑनलाईन मूव्हीदेखील पाहता येणार आहे. बुकमायशोचे सीईओ आशिष सक्सेना यांनी सांगितलं की, बुकमायशो चित्रपटांचा प्रीमियर, एक्सक्यूसिव, वर्ल्ड सिनेमा, मिस्ड इन थिएटर्स, फेस्टिव्हल फेव्हरेट आणि डेडिकेटेड बंडल्ससारख्या कॅटेगरी अंतर्गत लक्षकेंद्रीत करेल. या कॅटेगरी युजर्सच्या पसंद, मूड आणि नेचरनुसार विभागण्यात आल्या आहेत. बुक माय शो स्ट्रीम एक इनोव्हेशन आहे. हा प्लॅटफॉर्म थिएटर्सचा अनुभव घेऊ शकत नाही, परंतु हा सिनेमा व्यवसायातील एक विस्तार आहे. थिएटर्समध्ये मूव्ही रिलीज झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर चित्रपट सादर होतील, असंही सक्सेना म्हणाले.

आता बूक माय शो App वर युजर्सला ऑनलाईन मूव्हीदेखील पाहता येणार आहे. कंपनी युजर्सला ६०० हून अधिक चित्रपट आणि ७२००० हून अधिक तासांचा कंटेंट देत आहे. बुकमायशो स्ट्रीम सर्व्हिसमध्ये जगभरातील चित्रपट आणि कंटेंटची एक लायब्ररी असणार आहे. यात २२ हजारहून अधिक तासांचा कंटेंट एक्सक्यूसिव असेल,  जो याच प्लॅटफॉर्मवर लाँच होईल. बुकमायशो स्ट्रीममध्ये प्रत्येक शुक्रवारी अनेक प्रीमियर होतील. त्याशिवाय बुकमायशो स्ट्रीमवर युजर्स मूव्ही रेंट आणि सब्सक्रिप्शनवरही घेऊ शकतात. याचा चार्टही कॅटेगरी सिलेक्शननुसार वेगवेगळा असेल, जो ४० ते ७०० रुपयांपर्यंत असेल. माहितीनुसार बुक माय शो चित्रपटांचा प्रीमियर, एक्सक्यूसिव, वर्ल्ड सिनेमा, मिस्ड इन थिएटर्स, फेस्टिव्हल फेव्हरेट आणि डेडिकेटेड बंडल्ससारख्या कॅटेगरी अंतर्गत लक्ष केंद्रीत करेल. येथे थिएटर्समध्ये मिस केलेले चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. सोनी पिक्चर्स, वार्नर ब्रदर्स आणि युनिवर्सल पिक्चर्ससह ग्लोबल प्रोड्यूसर्स यांच्या भागीदारीसह हॉलिवूडचा कंटेंट सादर करण्यात येईल. बुकमायशो स्ट्रीममध्ये युजर्स क्रिस्टोफर नोलन फिल्म टेनट, गॅल गॅडोट स्टारर वंडर वुमन १९८४ आणि हॉरर फँटेसी द क्राफ्ट: लिगेसी यासारखे चित्रपट पाहू शकतात. विशेषत: ज्यांचे हे चित्रपट थिएटर्समध्ये पाहण्याचे राहून गेले आहेत, त्यांना असे चित्रपट पाहण्याची संधी आहे. सोनी पिक्चर्स, वार्नर ब्रदर्स आणि युनिवर्सल पिक्चर्ससह ग्लोबल प्रोड्यूसर्स यांच्या भागीदारीसह हॉलिवूडचा कंटेंट सादर करणार असल्याचं सक्सेना यांनी सांगितलं. ग्लोबल कंटेंटशिवाय प्रमुख भारतीय प्रोडक्शन हाउस वायाकॉम१८ , शेमारू आणि राजश्री प्रोडक्शन्ससह इतर रिजनल कंटेंट चित्रपटही असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments