Thursday, February 25, 2021
Home Entertainment वंडर वूमन १९८४ अखेर प्रदर्शनाच्या वाटेवर

वंडर वूमन १९८४ अखेर प्रदर्शनाच्या वाटेवर

वंडर वूमन १९८४ मध्ये अभिनेत्री गॅल गेडॉट हिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. ऑनलाईन प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये वंडर वूमनचं बालपण थोडक्यात दाखवण्यात आलं आहे. वंडर वुमन अर्थात डाएना प्रिंस लहानपणापासून शूर योद्धा असते. युद्धकलेत निपूण असलेली डाएना सुपरहिरो वंडर वूमन कशी होते, हे थोडक्यात या तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये १३ वर्षीय अभिनेत्री लिली एस्पेल हिने वंडर वूमनच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. तिने या व्हिडीमध्ये केलेले स्टंट पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत.

वंडर वुमन १९८४  हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री गल गडॉट हिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव वंडर वुमनचा पार्ट २ तयार करण्यात आला आहे. वंडर वूमन १९८४ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे हा सुपर अक्शनपट चार वेळा लांबणीवर गेला. वर्षाअखेर येत्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबरला जगभरातील सिनेमागृहांमध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतामध्ये सुद्धा हा चित्रपट एकाच दिवस प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी वंडर वूमन १९८४ चा ओपनिंग सीन ऑनलाईन प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनेकदा काही अफलातून मार्गांचा अवलंब केला जातो. त्यातच आता अशा कलात्मक आणि प्रभावी पद्धतीने चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाण्याचा हा मार्ग सध्या सर्वांच्याच पसंतीस आला आहे.

दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर वंडर वूमन १९८४ ची झलक पाहायला मिळत असल्याचा एक व्हिडीओ गलनं शेअर केला. यामध्ये रात्रीच्या वेळी, अंधाराच्या पार्श्वभूमीवर वंडर वुमनमुळे झळाळून निघालेल्या या इमारतीने सगळ्यांचेच डोळे दीपवून टाकले. जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारतीवर आपल्या आगामी चित्रपटाची झलक दिसल्याचा आनंदही तिने सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमधून शेअर केला. गलनं आपली उत्सुकता हे अविश्वसनीय आहे अशा शब्दांत व्यक्त केली. अवघ्या काही तासांमध्येच तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले.यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्ताने वंडर वूमन १९८४ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments