Monday, March 1, 2021
Home Entertainment युवराजने इंडीयन आयडलच्या मंचावर “खेळ मांडला”

युवराजने इंडीयन आयडलच्या मंचावर “खेळ मांडला”

सध्या सुरु असलेल्या इंडीयन आयडल सीजन १२ कार्यक्रमात जळगावच्या युवराज मेढे ने “खेळ मांडला.” युवराज फिल्मसिटी मध्ये गेली ३-४ वर्षे स्टेजच्या पाठी स्पॉटदादा म्हणून काम करत आहे. सेटवरचं सामान व्यवस्थित लावणं, साफसफाई हे त्याचं काम होतं. काम करताकरता तो बारकाईनं निरीक्षणही करत होता. त्याच्या कामातील नीटनेटकेपणा पाहून इंडियन आयडॉलच्या बॅकस्टेज संचामध्ये त्याची नेमणूक झाली. आता काम करताना त्याला स्पर्धकांची गाणीही ऐकायला मिळत होती. त्यावर येणाऱ्या परीक्षकांच्या प्रतिक्रियांकडे त्याचे विशेष लक्ष असायचं. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले नेहा कक्कर, विशाल दादलानी, हिमेश रेशमिया हे स्पर्धकांना ज्या टिप्स किना काही सूचना द्यायचे त्याकडे तो लक्ष ठेवून असायचा आणि घरी जाऊन त्यावर स्वताच्या गायनाच्या सुधारणा करण्यासाठी वापर करायचा. स्वतः गाताना त्याला त्याचा खूप उपयोग व्हायचा.

मूळचा जळगावचा असलेला युवराज त्याला लहानपणापासून गाणी ऐकण्याची आवड होती. ऐकलेली गाणी तो सतत गुणगुणत राहायचा. मित्रांनी आग्रह केला की त्यांच्यासाठी तो आवडीने गाणी म्हणून दाखवायचा. युवराजचा आवाज,  त्याचं गाणं मित्रांना खूप आवडायचं. युवराजही हौसेनं मित्रांच्या गाण्याच्या मागण्या पूर्ण करायचा. उदरनिर्वाहासाठी तो जळगावात छोटी-मोठी कामे करत असे. तेव्हा त्याचे काही मित्र मुंबई सारख्या मायानगरी मध्ये फिल्मसिटीत काम करत होते. त्यापैकीच एक मित्र सुट्टीसाठी गावी गेला असताना त्याची युवराजशी भेट झाली. ‘अरे, तू इतका छान गातोस तर तू मुंबईला चल. त्या मायानगरी मध्ये नक्कीच तुझ्यातील कलाकाराला न्याय मिळेल. तिथे काम करता करता संगीत क्षेत्रातील लोकांशी तुझी ओळखही होऊ शकेल. तू चल’ असा आग्रह मित्रानं केला आणि युवराज फिल्मसिटीत दाखल झाला.

ऑडिशन देताना युवराजच्या मनात थोडी चलबिचल सुरु होती. पण, स्वतःच्या कलेवर, मेहनतीवर विश्वास ठेवून त्यानं हे धाडस करण्याचे ठरवले होते आणि त्यात त्याच्या मेहनतीला यश आले, त्याची निवड झाली. अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं ‘खेळ मांडला’ हे गाणं त्यानं पहिल्या भागात गायले आहे. परीक्षकांनी युवराजच्या गाण्याचं भरभरून कौतुक तर केलंच. पण, त्याचा संघर्ष पाहून परीक्षकांचेही डोळे भरून आले. आणि त्याच बरोबर त्याच्या सपोर्ट साठी आलेल्या स्टेजवरील इतर स्पॉटदादांना पाहून पहिल्यांदी परीक्षकांची आश्चर्यजनक आणि नंतर आनंदी अशी संमिश्र प्रतिक्रिया पाहण्यात आली. कारण आपल्याच माणसांची असलेली साथ पाठीशी पुरेशी असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments