Sunday, February 28, 2021
Home Fashion सौंदर्य खुलवण्यासाठी घरेलू नुस्के

सौंदर्य खुलवण्यासाठी घरेलू नुस्के

भारतातच तुम्हाला वेगवेगळ्या त्वचा प्रकार दिसतात. थंड प्रदेशात त्वचा फुटण्याचा त्रास तर ज्या ठिकाणी ऊन जास्त आहे तिथे चेहरा काळवंडण्याचा त्रास होतो. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची त्वचा ही फारच वेगळी असते. ज्याप्रमाणे भारतातील वातावरणात फरक आहे. अगदी त्याचप्रमाणे जगभरातील वातावरणानुसार त्यांच्या त्वचेत बदल होत जातो. ज्या ठिकाणी बर्फ आहे तेथील लोकांच्या त्वचेतील मेलनिन अगदीच लाईट कलरचे असते म्हणून तुम्हाला त्यांची त्वचा पांढरी दिसते. जसजसे मेलनिनमध्ये बदल होतात. तसा त्वचेमध्ये फरक पडत जातो.

स्वयंपाकघरातील अनेक असे जिन्नस आहेत ते तुमच्या चेहऱ्याला चकाकी आणू शकतात. आणि तुम्हाला त्वचेच्या त्रासापासून दूर ठेऊ शकतात. किचनमधील रोजच्या वापराचे जिन्नस आहेत त्यांचा सौंदर्य प्रसाधन म्हणून उपयोग होऊ शकेल.

haldi mask

हळद ही बहगुणी आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. हळदीचा थेट वापर करण्यापेक्षा तुम्ही जर हळदीचे सेवन केले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होऊ शकेल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुधातून हळद प्या. तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

दालचिनी हा मसाल्याचा प्रकार असला तरी त्याचे सौंदर्यवर्धक फायदे आहेत. तुमची त्वचा काळवंडली असेल किंवा तुम्हाला पिंपल्स आले असतील तर तुम्हील दालचिनीचा वापर करु शकता.

त्वचा कोरडी असेल तरी दही तुमच्या चेहऱ्यामध्ये नैसर्गिक ओलावा आणू शकते. दह्याचा मास्क बनवणेही अगदी सोपे आहे. तुम्हाला दह्यात हळद, मध घालून तयार पॅक चेहऱ्याला लावायचा आहे. पॅक वाळल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे.

Homemade tips to open up beauty

हेल्दी डाएटमध्ये ओट्सचा समावेश केला जातो. पण ओट्सचे सौंदर्यवर्धकही फायदे आहेत. तुमच्या त्वचेला तजेला आणायचे असेल तर तुम्ही ओट्सचा मास्क नक्की लावून पाहायला हवा.

त्वचा अगदीच ड्राय असेल तर याचा वापर करु नका. काऱण अनेकदा पीठं लावून चेहरा कोरडा पडण्याची शक्यता जास्त असते. बेसन मास्क बनवताना तुम्ही त्यात थोडी हळद, अॅलोवेरा जेल आणि पाणी घाला आणि तयार मास्क चेहऱ्याला लावा.

तांदळाचं पीठ हा एक चांगला स्क्रब आहे. जर तुम्ही तांदळाचे पीठ हाताला लावून पाहिले तर ते खरखरीत लागते. त्यामुळे ते तुमची त्वचा अत्यंत नाजूक पद्धतीने स्क्रब करु शकते.

बदामामधील स्निग्धपणा तुमच्या चेहऱ्यासाठी चांगला असतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता. तुम्हाला चंदनाप्रमाणे बदाम उगाळायचे आहे आणि तुम्हाला बदाम तुमच्या चेहऱ्याला लावायचे आहे. असे एक ना अनेक स्वयंपाकामधील जिन्नस सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच बहुगुणी ठरतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments