Monday, March 1, 2021
Home India News अनिल अंबानींच्या कंपनी खरेदीसाठी ७० कंपन्या इंटरेस्टेड

अनिल अंबानींच्या कंपनी खरेदीसाठी ७० कंपन्या इंटरेस्टेड

रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी आतापर्यंत ७० प्रस्ताव आले आहेत. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीवर सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ९३ टक्के कर्ज विस्तारा आयटीसीएल इंडिया यांच्याकडून घेण्यात आले आहे. कमिटी ऑफ डिबेंचर होल्डर्स आणि डिबेंचर ट्रस्टी विस्तारा आयटीसीएल इंडियाच्या फायनान्शियल युनिट कमिटीच्या पुढाकाराने आरसीएलची  मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू केली गेलीय. कंपनीवर एकूण थकीत कर्जापैकी ९३ टक्के कर्ज युनिट्सचं आहे. कंपनीवर सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जदारांना सल्ला देणाऱ्या एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसला जवळपास एकूण ६० बोली प्राप्त झाल्या होत्या. एसबीआय लाइफ या कंपनीने रिलायन्स कॅपिटलची रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स ही कंपनी खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे जाहीर करुन प्रस्ताव सादर केला आहे. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपली आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीत जपानची सर्वात मोठी विमा कंपनी निप्पॉन लाइफ यांचे ४९ टक्के मालकी हक्क आहेत. रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीकडे सप्टेंबर २०२० च्या अखेरीस २१ हजार ९१२ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीचे शेअर बाजारातील मूल्य सप्टेंबर २०२० च्या अखेरीस १ हजार १९६ कोटी रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले. रिलायन्स कॅपिटलच्या रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या कंपनीला २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपले त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले. याच कारणामुळे रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स खरेदी करुन स्वतःचा व्यावसाय वाढवण्यास एसबीआय लाइफ ही कंपनी उत्सुक आहे. आरसीएलच्या सहाय्यक कंपन्या रिलायन्स जनरल विमा, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स फायनान्शियल लिमिटेड आणि रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये पूर्ण किंवा अंशिक भाग भांडवल खरेदी करण्यासाठी बोली मागवण्यात आल्या होत्या. विस्तारा आयटीसीएल इंडिया यांना एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जे एम फायनांशिअल सर्व्हिसेस या दोन कंपन्या सल्ला देत आहेत. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी आधी १ डिसेंबर २०२० पर्यंत इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही मुदत १ डिसेंबरला संपली त्यावेळी ६० प्रस्ताव आले होते. मात्र आणखी कंपन्या प्रस्ताव सादर करण्यास उत्सुक असल्याचे कळले. यामुळे प्रस्ताव सादर करण्याची मुदत १७ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली. मुदत वाढवताच दहा कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले. यामुळे १७ डिसेंबरला मुदत संपल्यानंतर रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या उपकंपन्या खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांची संख्या ७० झाली. रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स फायनांशिअल लिमिटेड, रिलायन्स असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड या उपकंपन्या पूर्ण अथवा मर्यादीत प्रमाणात खरेदी करण्यासाठी बोली मागवण्यात आली. रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स फायनांशिअल लिमिटेड यांचे १०० टक्के मालकी हक्क विकण्याची योजना आहे. रिलायन्स असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड या उपकंपनीचे ४९ टक्के मालकी हक्क विकण्याची योजना आहे. रिलायन्स असेट रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड या उपकंपनीकडे इंडियन कमॉडिटिज एक्सचेंजचे २० टक्के मालकी हक्क आहेत. हे हक्कही विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments