Sunday, February 28, 2021
Home India News ७ डिसेंबर - भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन

७ डिसेंबर – भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ७ डिसेंबर हा दिवस भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येत आहे. परंतु, अनेक लोकांना हे माहितही नसतं की, हा दिवस का साजरा केला जातो. याचा इतिहास काय आहे. स्मरण दिनास निधी देणारास कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत असत. त्या काळातील माजी ब्रिटिश सैनिकांबरोबरच भारतीय सैनिकसुद्धा हा निधी वापरू शकत होते. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाला ही प्रथा अयोग्य वाटल्याने त्यांनी अशा निधीचे संकलन एका विशिष्ट दिवशी करण्यात यावे व त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै, इ.स. १९४८ मध्ये घेतला. २८ ऑगस्ट, इ.स. १९४९ या दिवशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरविले.

२८ ऑगस्ट, १९४९ मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक कमिटी तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान आकाराच्या झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सैनिकांसाठी डोनेशन जमा करणे हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाला महत्त्व आहे. त्यामागील कारण म्हणजे, भारतीय सीमेवर दिवसरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणा-या जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशातील नागरिकांचं कर्तव्य आहे की, त्यांनी केवळ शहीदांची प्रशंसा न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचीही काळीजी घ्यावी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो.

७ डिसेंबर यादिवशी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी  केला जातो

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments