Sunday, March 7, 2021
Home India News सिनिअर्सना विमान प्रवास हाफ टीकिटमध्ये

सिनिअर्सना विमान प्रवास हाफ टीकिटमध्ये

विमानाचा प्रवास महागडा असल्यानं सामान्य नागरिक त्यानं प्रवास करत नाहीत, मात्र, हा प्रवास वेळ वाचवणारा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना याची सर्वाधिक गरज आहे. हेच पाहता आता एअर इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विमानाच्या तिकीटाच्या मूळ दरात अर्ध्यानं कपात केलीय. ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक आहे, अशा प्रवाशांना एअर इंडिया अर्ध्या दरात विमानाचं तिकीट देणार आहे. यासाठी तुमच्याकडे वयाचा पुरावा असणं गरजेचं असणार आहे. एअर इंडियाच्या वेबसाईटवरही याबाबतची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. पाहूया काय आहे माहिती.

एअर इंडियानं अर्ध्या दरात प्रवास करण्यासाठी काही नियमही बनविले आहेत. पहिला नियम हा कि, भारतीय नागरिकत्त्वाची आहे आणि दुसरा नियम ६० वर्षांहून अधिक वय असण्याची आहे. एव्हिएशन मिनिस्ट्रीनुसार जेव्हा ज्येष्ठ मंडी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करतील तेव्हा त्यांच्याजवळ काही आवश्यक कागदपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये ओळख पटण्यासाठी प्रवाशाकडे जन्मदिनांक, फोटो असलेले ओळखपत्र सामील आहे. मिनिस्ट्रीने म्हटले की जर प्रवाशाकडे ओळखपत्र नसेल तर त्याला तिकिटात सूट दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला पूर्ण भाडे द्यावे लागेल. एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासच्या तिकीटावरच ही सवलत दिली जाईल. याद्वारे तुम्ही भारतात कुठेही फिरु शकता. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांनाही पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे. हाफ तिकीट तुम्हाला बूक करायचं असेल तर ते ७ दिवसांआधी बूक करावं लागणार आहे. त्याआधी बूक केलेल्या तिकीटावर ही सवलत लागू नसेल. एअर इंडियाने यापूर्वी स्किमची घोषणा केली होती. मात्र आता उड्डयन मंत्रालयानेच त्याला अधिकृत पणे मान्यता दिली आहे. केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करणार आहे आणि कंपनीची १०० टक्के भागीदारी विकणार आहे. त्यासाठी टाटा ग्रूपनेही बोली लावली आहे. त्यातच तोटा कमी करण्याचा आणि एअर इंडियाच्या प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसत आहे.

एअर इंडियानं यापूर्वी स्किमची घोषणा केली होती. मात्र आता उड्डान मंत्रालयानेच त्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करणार आहे, आणि कंपनीची १०० टक्के भागीदारी विकणार आहे. त्यासाठी टाटा ग्रूपनंही बोली लावलीय. त्यातच तोटा कमी करण्याचा आणि एअर इंडियाच्या प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments