संरक्षण दलाचा एरो इंडिया शो हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्या भाग घेतात. या वर्षी आयोजित करण्यात आलेला एअरो शो हा हायब्रिड स्वरुपाचा असेल. त्यामध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही पध्दतीने भाग घेता येणार आहे. जे लोक प्रत्यक्षात या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये फेब्रुवारी महिन्यात ३ ते ५ तारखेच्या दरम्यान संरक्षण दलाचे सर्वात मोठे प्रदर्शन ‘एअरो इंडिया शो’ आयोजित करण्यात येत आहे.
या एयर शोमध्ये ४२ भारतीय एअर क्राफ्ट भाग घेणार आहेत. ज्यामध्ये Mi-17 V5, ALH, LCH, LUH, C-17, Embraer, AN-३२, Jaguar, Hawk, Su-30, LCA, Rafale आणि Dornier या एअर क्राफ्टचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वर्षी सुर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले एक सोबत होणार आहेत. त्याच बरोबर परशुराम एअरक्राफ्ट या शोमध्ये भाग घेणार आहे. तसेच काही विदेशी एअर क्राफ्टचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी एअर क्राफ्टच्या समावेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये दिवसातून दोन वेळा एअर डिस्प्ले असेल. कोरोनाचा काळ लक्षात घेता नेहमी पाच दिवसांचा असलेला हा कार्यक्रम या वर्षी तीन दिवस असेल असे नियोजन करण्यात आले आहे.
मागील वेळच्या एअर शो मध्ये पार्किंग लॉटमध्ये आग लागल्याने अनेक गाड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी तशा प्रकारचा कोणताही अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. त्यामुळे या वेळी तशा प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. सुरक्षा आणि मेडिकल सुविधांवर विशेष ध्यान दिलं जात आहे.