आसाम राज्यात आता मुलीच्या आई-वडिलांची ही चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या लग्नात १० ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मोफत भेट म्हणून देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारनं घेतला आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम सरकार राज्यातील ज्या परिवारांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे अशा परिवारांना १० ग्रॅम सोन्याचा शिक्का देणार आहे. परिवारातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून विवाहाच्या नोंदणीकरणानंतर प्रत्येक विवाह झालेली मुलगी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या १० ग्रॅम सोन्यच्या शिक्क्याचा लाभ घेऊ शकते. भारतात सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड महत्व आहे. खासकरुन लग्नासारख्या समारंभात याची मागणी जास्त असते. घरातील मुलीचे लग्न म्हटले की आई-वडिलांना थोडे काळजीतच पडतात. कारण लग्नातील खर्च प्रत्येक परिवाराला परवडेल असा नसतो. अशावेळी काहीजण कर्ज घेऊन आपल्या मुलीचे लग्न लावतात. अशावेळी गरीब आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात सोनं देण्यासाठी प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागतो.
आसाम सरकारच्या अरुंधती गोल्ड स्किमच्या घोषणेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामुळे मुलींच्या अधिकारासह त्यांच्या विकासाकरिता हातभार लागू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अर्ज करावा लागणार आहे. अरुंधती गोल्ड स्किम अंतर्गत अशाच कुटुंबाला लाभ मिळणार आहे ज्यांना कमीतकमी दोन मुली आहेत. परंतु दोन पेक्षा अधिक मुली परिवारात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. अरुंधती गोल्ड स्किमनुसार विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षापेक्षा अधिक आणि मुलाचे २१ वर्षाहून अधिक असावे अशी अट आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असावे. वधूच्या कुटूंबाला विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये लग्नाची नोंदणी करावी लागणार आहे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आसाम सरकारच्या या अरुंथती गोल्ड स्किममुळे आर्थिक चणचण भासत असलेल्या परिवाराची नक्कीच मदत होणार आहे. तसेच सरकारकडून आधीच मुलींच्या शिक्षणासाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलींसह त्यांच्या आर्थिक परिवाराला थोडा हातभार लागू शकतो.
अरुंधती सुवर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी revenueassam.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर त्यांची हार्ड कॉपी घेऊन ती सबमिट करणे आवश्यक आहे. यानंतर आपला अर्ज स्विकारला गेला की नाही हे एसएमएसद्वारे कळवले जाते.