Thursday, February 25, 2021
Home India News पोस्ट ऑफिस बँक एका क्लिकवर

पोस्ट ऑफिस बँक एका क्लिकवर

पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत तुमचे अकाउंट असेल तर आता या दोघांच्या बँकिंग सेवा तुम्ही एकाच अ‍ॅपवर वापरु शकणार आहात. मंगळवारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि टपाल विभाग (डीओपी) यांनी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाकपे’ लाँच केले. एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये एक नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप DakPay लाँच करण्यात आले, यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितित या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे वापरता येतील. हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवरुन फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. डाउनलोड केल्यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाइल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे बँक अकाउंट अ‍ॅपसोबत लिंक करु शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त बँकही लिंक करु शकतात. यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे चार अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल. डिजिटल पेमेंटसाठी ‘DakPay’ या अ‍ॅपमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ग्राहक ‘डाकपे’च्या माध्यमातून डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात. कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल. याद्वारे, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. युटिलिटी बिल देखील भारता येऊ शकणार आहे. यावेळी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जगभर थैमान घालणाऱ्या कोविड -१९ या महामारी विरुद्धच्या लढाई दरम्यान इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने केलेल्या कामाचे तसेच इंडिया पोस्ट पेमेंटस बँक लाँच झाल्यापासून २ वर्षापेक्षा कमी कालावधीत ३ कोटी खात्यांचा टप्पा गाठल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

युजर्सना डाक पे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करता येईल. डाउनलोड केल्या नंतर नाव, मोबाईल, आणि पिन कोड इ. माहितीसह तुम्हाला स्वताची प्रोफाइल बनवावी लागेल. त्यानंतर तुम्ही तूमच्या बँक अकाउंटला या अ‍ॅप सोबत लिंक करता येते. एकापेक्षा अधिक बँक अकाउंटसुद्धा अ‍ॅप सोबत लिंक करु शकता. या अ‍ॅप सोबत किराणा स्टोअर ते मोठ्या शॉपिंग सेंटर मध्येही पेमेंट करू शकता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments