Sunday, February 28, 2021
Home India News अॅमेझॉन विरोधात ईडीचा तपास सुरु

अॅमेझॉन विरोधात ईडीचा तपास सुरु

अॅमेझॉनने रिलायन्स समूह आणि फ्यूचर रिटेल ग्रुपमध्ये झालेल्या कराराला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना सांगितलं होतं की काही तडजोडींच्या माध्यमातून फ्यूचर रिटेल ग्रुपवर अॅमेझॉन आपले अप्रत्यक्ष स्वरुपात नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे फेमा आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन समजले जाईल.  दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी आणि वाणिज्य मंत्रालयाचे निर्देश आल्यानंतर ईडीने अॅमेझॉन विरोधात तपास सुरु केला आहे. यावर अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की ईडीच्या या तपासाबद्दल अॅमेझॉनला अजून तरी काहीच माहित नाही. सूत्रांनी सांगितलं की ईडी आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे आणि लवकरच अॅमेझॉनकडून याची सविस्तर माहिती मागवण्यात येणार आहे.

अ‍ॅमेझॉनने किशोर बियानी यांच्या मालकीच्या फ्यूचर रिटेलच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिग्रहणाला आव्हान दिले होते. गेल्या महिन्यात या प्रकरणावर निर्णय देताना दिल्ली हायकोर्टाने म्हटले होते की, अ‍ॅमेझॉन अप्रत्यक्षपणे बिग बझारच्या मालकाला नियंत्रित करत आहे. यासाठी शासकीय मान्यता घेण्यात आली नव्हती. कोर्टाने गेल्या महिन्यात अ‍ॅमेझॉनवर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, काही कराराद्वारे अ‍ॅमेझॉनचा अप्रत्यक्षपणे फ्यूचर रिटेलवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न हा फेमा आणि विदेशी थेट गुंतवणूक नियमांचे उल्लंघन मानला जाईल.

फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या उल्लंघनाच्या प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केला आहे. या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळते. अॅमेझॉन सोबतच आता फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यां विरोधातही फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या कंपन्यांसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अ‍ॅमेझॉनने फ्यूचर कूपनमध्ये ४९% भागभांडवल खरेदी केली, ही फ्यूचर ग्रुपची असूचीबद्ध कंपनी आहे. अमेझॉनने फ्यूचर ग्रुपचे युनिट फ्यूचर कूपन्स लि. मधील या आपल्या हिस्स्याचा आधार घेत, फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील कराराला विरोध केला आहे. २४,७१३ कोटी रुपयांवर हा करार झाला आहे. आता उच्च न्यायालयाच्या २१ डिसेंबरच्या निकालाच्या आधारे ईडीने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. या आधी दिल्ली उच्च न्यायालयानेही अॅमेझॉन विरोधात टिप्पणी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments